बाप लेकीच्या नात्याला काळिमा! वडिलांचा मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडितेनं पेट्रोल टाकून घेतलं पेटवून
Crime News : बापाने मुलीचं लैंगिक शोषण केलं, नंतर तिला दुसऱ्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. हे पाहून पीडितेनं स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वडिलांचा मुलीवर सातत्याने लैंगिक अत्याचाराचा आरोप
तिने स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं
Crime News : ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यातील ब्रह्मपुरमध्ये मन हेलावून टाकणारा प्रकार उघडकीस आला. बापाने मुलीचं लैंगिक शोषण केलं, नंतर तिला दुसऱ्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. हे पाहून पीडितेनं स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतलं. या घटनेनं वडील आणि लेकराच्या नात्याला काळिमा फासणारी घटना आहे.
हे ही वाचा : बाईक चोरीचा संशय, तरुणाला विजेचा शॉक; Video व्हायरल
वडिलांचा मुलीवर सातत्याने लैंगिक अत्याचाराचा आरोप
पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणीने जबाबात सांगितलं की वडील हे तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार करत आहे. एवढंच नसून दूसऱ्या लोकांसोबत शरीसंबंध ठेवण्यास दबाव देखील आणला होता. पीडितेनं आरोप करत सांगितलं, या पूर्ण प्रकरणात विरोध केला असता, वडिलांनी तिचा मानसिक छळ केला.
या प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक आलोक जेना यांनी घटनेला दुजोरा दिला होता. त्यांनी सांगितलं की, पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान, मुलीच्या आणि तिच्या वडिलांचे चॅट्स, मोबाईल फोन आणि इतर पुरावे जप्त केले. या पुराव्यांच्या आधारे आरोपी वडिलांना अटक देखील करण्यात आली. एएसपी आलोक जेना यांनी सांगितलं की, तपासातून इतर अनेक व्यक्तींची नावे समोर आलेली आहेत. त्यांचा देखील तपास करण्यात येत आहे.
तिने स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं
पोलीस तपासातून उघड झाले की, आरोपी बापाने आपल्या मुलीची शैक्षणिक प्रमाणपत्रे ही स्वत:कडे ठेवली होती. आरोपी बापानेच तिच्यावर वाईट कृत्य केल्याचा आरोप आहे. या आरोपांमुळे वैवाहिक जीवनात मोठा वाद निर्माण झाला, ती सासरच्या मंडळींपासून विभक्त झाली. 9 जुलैच्या सकाळी. ती महिला तिच्या सासरी परतली. तिने स्वत:ला घराच्या छतावर कोंडून घेतले आणि पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतलं.










