'पप्पा माझ्यावर बलत्कार करतात, दुसऱ्यांनाही...' मुलीनं पेटवून घेतलं, नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

घर, जिथे सर्वात सुरक्षित असायला पाहिजे, तेच जर सर्वात मोठी भीती बनले तर? ओडिशाच्या ब्रह्मपूरमध्ये मुलीने पोलिसांकडे केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिचे वडील बऱ्याच काळापासून तिचा लैंगिक छळ करत होते आणि इतर पुरुषांशी संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होते.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

'पप्पा माझ्यावर बलत्कार करतात, दुसऱ्यांनाही...'

point

मुलीनं पेटवून घेतलं

point

नेमकं प्रकरण काय?

Crime News : मन हेलावून टाकणारी एक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणीने स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत ती गंभीररित्या भाजली असून, सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला असता, पीडित तरुणीने आपल्याच वडिलांवर दीर्घकाळापासून लैंगिक छळ करत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तरुणीच्या या जबाबानंतर पोलिसांनी आरोपी पित्याला अटक करून न्यायालयात हजर केले आहे.

वडील सातत्याने करायचे बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांकडून सातत्याने होणाऱ्या बलात्काराला आणि त्रासाला कंटाळूनच पीडितेने हे टोकाचे पाऊल उचलले होते. या अत्यंत संवेदनशील प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, पोलिसांनी घटनेची स्वतःहून दखल घेत (सुओ मोटो) गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर रुग्णालयात नोंदवण्यात आलेला पीडितेचा जबाब आणि तपासात हाती आलेल्या पुराव्यांच्या आधारे नराधम वडिलांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यातील ब्रह्मपूर परिसरातील ही घटना आहे.

हे ही वाचा : Maharashtra Weather : जुलैमध्ये पावसाची दांडी, राज्यात असं का घडतंय? हवामान विभागाची अपडेट

सोशल मीडियावरील चॅट्स

या तपासादरम्यान पोलीस आणि फॉरेन्सिक टीमच्या हाती काही महत्त्वाचे तांत्रिक पुरावे लागले आहेत. बाप आणि मुलीमध्ये झालेले व्हॉट्सॲप किंवा इतर सोशल मीडियावरील चॅट्स पोलिसांना मिळाले असून, या चॅट्सना गुन्ह्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा पुरावा मानले जात आहे. या संभाषणांच्या आधारेच पोलीस आपला तपास पुढे नेत आहेत. याशिवाय, पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिचे वडील तिच्यावर इतर पुरुषांशीही संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होते.

हे ही वाचा : 'देवेंद्र फडणवीसांनीच 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहावं..', महसूल मंत्री बावनकुळेंच्या 'या' वक्तव्याचा नेमका काय अर्थ

शैक्षणिक प्रमाणपत्रे ताब्यात घेतली अन्...

पीडित तरुणीने जेव्हा या अत्याचाराला वाचा फोडण्याचा आणि वडिलांचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने तिचे सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे स्वतःच्या ताब्यात घेतले होते, जेणेकरून ती त्याच्याविरुद्ध कोणतेही पाऊल उचलू शकणार नाही. सध्या पोलीस या सर्व आरोपांची सखोल चौकशी करत आहेत. तपासादरम्यान इतरही काही संशयितांची नावे समोर आली असून, गुन्ह्यातील त्यांच्या भूमिकेची पडताळणी केली जात आहे. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
 

हे वाचलं का?