वर्गमित्राकडून अनन्वित छळ करुन हत्या, मेडिकलच्या विद्यार्थीनीसोबत काय घडलं?

मुंबई तक

kerala medical student murder : उझबेकिस्तानमध्ये शिकणाऱ्या केरळच्या विद्यार्थिनीच्या हत्येनंतर कुटुंबीयांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. धर्मांतरासाठी दबाव टाकला जात होता, असा दावा करत त्यांनी भारतात तपास करण्याची मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

वर्गमित्राकडून अनन्वित छळ करुन हत्या

point

मेडिकलच्या विद्यार्थीनीसोबत काय घडलं?

kerala medical student murder : उझबेकिस्तानमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या केरळमधील 21 वर्षीय सावरिया बसंत हिच्या हत्येप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. सुरुवातीला समोर आलेल्या माहितीपेक्षा हा हल्ला खूपच क्रूर होता, असा दावा त्यांनी केला आहे. सावरियाची हत्या तिच्याच वर्गातील सदरुल अनाम याने केल्याचा आरोप आहे. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने तिच्या डोक्यावर वार केला आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे.

हेही वाचा : आठवीच्या विद्यार्थ्यानीवर चोरीचा संशय, शिक्षकांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे घडलं भयानक

तरुणीच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणा

सावरियाचा मृतदेह केरळमध्ये आणल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी अलप्पुझा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला. सावरियाचे काका जनीश यांनी सांगितले की, उझबेकिस्तानमधील तपास अधिकाऱ्यांनी तिच्या संपूर्ण शरीरावर जखमांच्या अनेक खुणा असल्याची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला काही क्षणांत झालेला नव्हता, तर तिच्यावर खूप मारहाण करण्यात आली होती.

हेही वाचा : मिसिंग लिंक : पहाटे तीनची वेळ, समोर कोसळती दरड अन् SOSचं बटण, तरुणांच्या प्रसंगावधानाची चर्चा

हे वाचलं का?