मिसिंग लिंक : पहाटे तीनची वेळ, समोर कोसळती दरड अन् SOSचं बटण, तरुणांच्या प्रसंगावधानाची चर्चा
missing link tunnel landslide : मिसिंग लिंक बोगद्यात दरड कोसळल्यानंतर तीन तरुणांनी एसओएस बटण दाबून आणि इतर वाहनांना सतर्क करत संभाव्य मोठी दुर्घटना टाळल्याचा अनुभव सांगितला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या या तरुणांनी भीतीदायक क्षण, प्रशासनाचा प्रतिसाद आणि त्या रात्रीचा संपूर्ण अनुभव मांडला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मिसिंग लिंक : पहाटे तीनची वेळ
समोर कोसळती दरड अन् SOSचं बटण, तरुणांच्या प्रसंगावधानाची चर्चा
missing link tunnel landslide : मिसिंग लिंक प्रकल्पातील दरड कोसळण्याच्या घटनेनंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या तीन तरुणांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे. संदेश खरात, रोशन सरगर आणि अक्षय लांडगे हे तिघे सांगलीचे असून सध्या नवी मुंबईतील नेरूळ येथे वास्तव्यास आहेत. सांगलीहून मुंबईकडे येत असताना पहाटे सुमारे तीनच्या सुमारास ते मिसिंग लिंक बोगद्यात पोहोचले. बोगद्याच्या शेवटच्या टप्प्याजवळ पोहोचताच वरून पाणी आणि लहान दगड पडताना दिसू लागले. पुढे जाणे धोकादायक वाटल्याने त्यांनी गाडी थांबवली. काही वेळातच मोठा दगड आणि मातीचा ढिगारा रस्त्यावर कोसळल्याने संपूर्ण मार्ग बंद झाला. सुरुवातीला नेमके काय घडत आहे हे समजत नसल्याने बोगदाच कोसळत असल्याची भीती त्यांच्या मनात निर्माण झाली होती.
हेही वाचा : Personal Finance: दरमहा 2 हजार गुंतवा आणि 42 हजार परत मिळवा, लखपती बनण्याचा फॉर्म्युला!
एसओएस बटण दाबले अन् काही मिनिटांत टोईंग वाहन आले
घटना घडल्यानंतर त्यांनी तातडीने बोगद्यातील एसओएस बटण दाबले. त्यानंतर काही मिनिटांत टोईंग वाहन आल्याचे त्यांना दिसले आणि त्यामुळे आपला संदेश संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचल्याचा विश्वास त्यांना वाटला. त्याचबरोबर त्यांनी मागून येणाऱ्या वाहनांना हातवारे करून पुढे न जाण्याचा इशारा दिला. परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळाचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड केला, जेणेकरून पुण्याकडून येणाऱ्या इतर वाहनचालकांना आधीच सावध करता येईल. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अनेक प्रवाशांनी त्यांच्याशी संपर्क साधून रस्त्यावरील परिस्थिती आणि वाहतूक सुरू झाली का, याबाबत विचारणा केली.
हेही वाचा : आदित्य ठाकरे विधानसभेत चवताळून उठले.. पण तिथं आधी आणि नंतर घडलं तरी काय?, सगळंच प्रचंड इंटरेस्टिंग!










