निळा ड्रम हत्याकांड: कोर्टाचा प्रचंड मोठा निकाल, सौरभ राजपूतला संपवणाऱ्या मुस्कान आणि साहिलला कोर्टाने सुनावली 'ही' शिक्षा

मेरठमधील गाजलेल्या निळ्या ड्रम हत्याकांड प्रकरणात सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

blue drum murder case verdict muskan sahil death sentence saurabh rajput
मुस्कान-साहिलला कोर्टाने सुनावली शिक्षा
Google CTA

Blue Drum Case Verdict: मेरठमधील निळा ड्रम हत्याकांड प्रकरणी (सौरभ राजपूत हत्याकांड) आरोपी पत्नी मुस्कान आणि तिचा बॉयफ्रेंड साहिल यांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. निकालाच्या वेळी सौरभचे कुटुंबीय न्यायालयात उपस्थित होते. निकालानंतर सौरभच्या आईने 'आज तक'शी बोलताना सांगितलं की, "तुम्हाला एकत्र राहायचे नसेल तर वेगळे व्हा, पण कोणाच्या मुलाचा जीव घेऊ नका." ती म्हणाली, "आमच्यासाठी आमचा मुलगा (सौरभ) कधीच कुठेही गेला नाही. त्याच्या आठवणी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आहेत. माझा संदेश हा आहे. कोणाच्याही मुलाची/पतीची हत्या करू नका." जर तुम्हाला एकत्र राहायचे नसेल, तर वेगळे व्हा. मुलगा असो वा मुलगी. नाहीतर, मुस्कान आणि साहिलप्रमाणे तुम्हालाही फाशी दिली जाईल.

मुस्कानच्या पालकांची प्रतिक्रिया

शिक्षा सुनावण्याच्या अगदी आधी, मुस्कानच्या पालकांनी न्यायालयाला लेखी हमी दिली की, त्यांच्या मुलीला फाशी दिल्यास त्यांना कोणताही आक्षेप नसेल. कुटुंबाने सौरभला एक खूप चांगला मुलगा असेही म्हटले. विशेष म्हणजे, मुस्कानच्या पालकांनी तुरुंगात तिची भेटही घेतली नाही.

हे ही वाचा>> नालासोपारा: नवजात बाळाला विकले, 17 वर्षीय आईसह डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल

निकालानंतर न्यायालयात घोषणाबाजी

अरविंद कुमार मिश्रा (जिल्हा आणि सत्र न्यायाधीश) यांनी निळा ड्रम हत्याकांडाच्या सुनावणीदरम्यान महाभारताचा संदर्भ दिला. शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयात 'भारत माता की जय'च्या घोषणा देण्यात आल्या. पीडित पक्षाने या निकालाला न्यायाचा विजय म्हटले आहे.

हे ही वाचा>> नवी मुंबईत नऊ वर्षांच्या शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, नंतर गळा दाबून संपवलं

शिक्षा सुनावण्यापूर्वी सौरभच्या आईने असंही सांगितलं की, मुलाच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाने न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न केले आहेत. त्यामुळे, त्या प्रशासनाच्या आणि या प्रकरणात त्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्वांच्या आभारी आहेत. न्यायालयात आमच्या बाजूने साक्ष देणाऱ्या साक्षीदारांचेही आम्ही आभार मानतो. सौरभची आई सुरुवातीपासूनच या प्रकरणात फाशीच्या शिक्षेची मागणी करत होती.

वकिलांनी नेमकं काय सांगितलं?

या प्रकरणातील वकील कृष्ण कुमार दुबे म्हणाले की, या गुन्ह्यासाठी दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुस्कान आणि साहिल यांना कलम 302 अंतर्गत 50,000 रुपये आणि कलम 238 A अंतर्गत 20,000 रुपये दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ते म्हणाले की, बचाव पक्षाने अनेक युक्तिवाद केले होते, जसे की खुनाचा कोणीही साक्षीदार नव्हता आणि मुस्कानला मुली आहेत.. परंतु हे सर्व युक्तिवाद फेटाळण्यात आले कारण फिर्यादी पक्षाने सादर केलेला पुरावा इतका सबळ, महत्त्वपूर्ण आणि अचूक होता की त्याने त्यांचा गुन्हा पूर्णपणे सिद्ध केला.