नालासोपारा: नवजात बाळाला विकले, 17 वर्षीय आईसह डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल

Nalasopara Crime News : नालासोपारा येथून मन सुन्न करून टाकणारी घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीची आई आणि एका शेजाऱ्याने मिळून त्या नवजात बाळाला विरारमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याला विकण्याचा कट रचल्याची ही लज्जास्पद घटना आहे.

ADVERTISEMENT

Nalasopara crime (AI Photo)
Nalasopara crime (AI Photo)
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नालासोपारा येथून मन सुन्न करून टाकणारी धक्कादायक घटना

point

17 वर्षीय अल्पवयीन मुलगी झाली आई

point

नवजात बाळाला विकण्याचा रचला कट

Nalasopara Crime News : प्रवीण नलावडे - नालासोपारा येथून मन सुन्न करून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने एका बाळाला जन्म दिला, परंतु तिला तिचे एक दिवसाचे बाळ सापडत नव्हते. पोलिसांच्या तपासातून उघडकीस आले की, त्या अल्पवयीन मुलीची आई आणि एका शेजाऱ्याने मिळून त्या नवजात बाळाला विरारमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याला विकण्याचा कट रचल्याची ही लज्जास्पद घटना आहे.  

डॉक्टर आणि बाळ विकत घेणाऱ्या जोडप्याविरुद्ध एफआरआय दाखल

संबंधित घटनेची माहिती मिळताच, तुळिंज पोलिसांनी तातडीने कारवाई करत नवजात बाळाला ताब्यात घेत आईकडे परत केले. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना असून तरुणाला अटक केली. अल्पवयीन मुलीची आई, शेजारी, या घटनेत सामील असलेले डॉक्टर आणि बाळ विकत घेणाऱ्या जोडप्याविरुद्ध एफआरआय दाखल करण्यात आला. या घटनेच्या संदर्भात पालिकेनं खाजगी रुग्णालयात सील करण्यात आले होते. 

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत विरारमध्ये राहणाऱ्या जोडप्याचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी नवजात बाळाला ताब्यात घेऊन त्याच्या आईकडे परत केले होते. संबंधित प्रकरणात तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय जाधव यांनी सांगितलं की, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या तरुणाला अटक करण्यात आली. 

नवजात बाळाच्या तस्करीचा प्रश्न ऐरणीवर 

या प्रकरणी रुग्णालयात झालेल्या प्रसूतीची आणि या संपूर्ण घटनेत सहभागी असलेल्यांच्या भूमिकांची चौकशी करण्यात आली. हरवलेल्या बाळाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत बाळाचा शोध घेतला आणि आईकडे परत केले. या प्रकरणाने अल्पवयीन मुलींच्या सुरक्षितता, नवजात बाळांची सुरू असलेली कथित तस्करी विक्रीबाबतचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे.