सोलापूर : रीलस्टार विवाहिता स्वत:च्या हॉटेलच्या स्वयंपाकघरात गेली, अन् सर्वांची झोप उडाली
Solapur Crime News : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एका लोकप्रिय रीलस्टार विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोलापूर : रीलस्टार विवाहिता स्वत:च्या हॉटेलच्या स्वयंपाकघरात गेली
अन् सर्वांची झोप उडाली; नेमकं काय घडलं?
Solapur Crime News : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे एका विवाहित महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे. लोकप्रिय रीलस्टार असलेल्या या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे मंगळवेढा तालुक्यासह सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : विधान परिषद निवडणूक : महायुतीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर, कोण किती जागा लढणार?
स्वयंपाक खोलीत गळफास घेऊन केली आत्महत्या
रोहिणी निलेश पाराध्ये (वय 25) असं आत्महत्या केलेल्या रीलस्टार विवाहितेचं नाव आहे. दरम्यान, तिने टोकाचे पाऊल कशामुळे उचलले? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रोहिणी ही ब्रह्मपुरी येथील स्वत:च्या “हॉटेल ग्रामपंचायत”च्या स्वयंपाकघरात गेली होती. तिला पत्र्याच्या स्वयंपाक खोलीत लोखंडी अँगल दिसला होती. त्याच अँगलला तिने दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पती निलेश पाराध्ये यांनी पोलिस ठाण्यात खबर दिली असून घटनेची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा : Astrology : आजच्या दिवशी 'या' राशींना होणार आर्थिक लाभ, जाणून घ्या राशीभविष्य









