मुंबईची खबर : वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडसाठी एक हजार वृक्षांची कत्तल? मंजुरी मिळणार का?

मुंबई तक

वर्सोवा ते दहिसर या कोस्टल रोडसाठी तब्बल एक हजार झाडांची कत्तल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Versova-Dahisar Coastal Road
Versova-Dahisar Coastal Road
google news

बातम्या हायलाइट

point

वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडसाठी एक हजार वृक्षांची कत्तल?

point

मंजुरी मिळणार का?

Versova-Dahisar Coastal Road : वर्सोवा ते दहिसर या कोस्टल रोडसाठी तब्बल एक हजार झाडांची कत्तल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 1288 झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. बीएमसीच्या वृक्ष प्राधिकरणाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात येणार असल्याची माहिती आहे. या वृक्षतोडीची भरपाई म्हणून पनवेलमध्ये 19, 500 झाडं लावण्यात येणार आहेत. 

वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी..

वर्सोवा ते दहिसर या रोडमुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधनात बचत होणार आहे. तसेच एसव्ही रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस वेवरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. असं असलं तरीही या प्रकल्पामुळे हजारो झाडांचा बळी जाणार आहे. त्यामुळे अनेक पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शवला आहे. एका ठिकाणची झाडे तोडून दुसऱ्या ठिकाणी लावल्यामुळे नक्की काय होणार आहे, असा सवाल ते विचारत आहेत.

हे ही वाचा : वाशीम : नगरपालिका देखल घेईना, बापाला मुलांसाठी ड्रेनेजमध्ये उतरण्याची वेळ

सहा प्रस्ताव

कोस्टल रोड विभागाकडून या वृक्षतोडीविषयी सहा विविध प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. हे प्रस्ताव बीएमसीच्या वृक्ष प्राधिकरणाकडे मांडण्यात आले असून लवकरच त्यावर चर्चा होणार आहे. हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यामुळे मुंबईतील हरित आच्छादन कमी होणार असल्याने पर्यावरण प्रेमी विरोध करत आहेत. 

हे ही वाचा : सोलापूर हादरलं! दोन वर्षांच्या चिमुकल्यासह आईनं नको तेच... भयंकर घडलं

निर्णयाकडे लक्ष

वर्सोवा-दहिसर या कोस्टल रोडसाठी झाडे तोडून त्याची भरपाई पनवेल येथे वृक्ष लागवच करुन केली जाणार आहे, तर पवई उद्यानात येथील काही झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. आता याविषयी वृक्ष प्राधिकरण काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

हे वाचलं का?