सोलापूर हादरलं! दोन वर्षांच्या चिमुकल्यासह आईनं नको तेच... भयंकर घडलं

मुंबई तक

Solapur Crime : सोलापूरमध्ये दोन वर्षाच्या चिमुकल्यासह वहिरीत उडी मारून महिलेनं जीवन संपवलं. मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास अक्कलकोटच्या मैंदर्गी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत मृत महिलेच्या आईने सासरच्या सात जणांविरोधात संशय व्यक्त करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

ADVERTISEMENT

Solapur Crime
Solapur Crime
google news

बातम्या हायलाइट

point

आईनं दोन वर्षांच्या चिमुकल्यासह उडी घेत संपवलं जीवन

point

मृत महिलेच्या आईकडून सासरच्यांविरोधात तक्रार 

Solapur Crime : विजय बाबर - सोलापूरमध्ये दोन वर्षाच्या चिमुकल्यासह वहिरीत उडी मारून महिलेनं जीवन संपवलं. मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास अक्कलकोटच्या मैंदर्गी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत मृत महिलेच्या आईने सासरच्या सात जणांविरोधात संशय व्यक्त करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

हे ही वाचा : Astrology : शनी आणि केतूचा विशेष योग, 'या' राशींचे भाग्य उजळणार

आईनं दोन वर्षांच्या चिमुकल्यासह उडी घेत संपवलं जीवन

जीवन संपवलेल्या मृत महिलेचं नाव भाग्याश्री सिद्धप्पा कट्टीमनी (वय 30) अशी ओळख समोर आली. मंगळवारी दुपारी तोरणी रोडनजीक असलेल्या विहिरीत तिने दोन वर्षांच्या चिमुकल्यासह उडी घेत जीवन संपवलं. या घटनेची माहिती तिच्या माहेरच्या नातेवाईकांना समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. 

भाग्यश्रीची आई कलव्वा बसप्पा पुजारी यांनी नातेवाईकांसह घटनास्थळी धाव घेतली. गावकरी आणि पोलिसांच्या मतदीने विहिरीतून प्रथम दोन वर्षीय शिवराजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. त्यांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीदरम्यान त्याला मृत घोषित केले. 

अशातच भाग्यश्रीचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगत होता. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवला. मात्र, डॉक्टरांनी तिला देखील मृत घोषित केले. यानंतर भाग्यश्रीच्या आईने पोलिसांकडे घटनेबाबत तक्रार दाखल केली. 

हे वाचलं का?