'तिनं 11 वर्ष सगळं सहन केलं..' सांगलीतील विवाहितेचा तमिळनाडूत मृत्यू

मुंबई तक

सासरच्या छळामुळे एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत विवाहिता मूळची पलूस येथील रहिवासी असून विवाहानंतर तामिळनाडू राज्यातील नागापट्टीनम येथे वास्तव्यास होती.

ADVERTISEMENT

Sangli Crime
Sangli Crime
google news

बातम्या हायलाइट

point

'तिनं 11 वर्ष सगळं सहन केलं..'

point

सांगलीतील विवाहितेचा तमिळनाडूत मृत्यू

Sangli Crime, स्वाती चिखलीकर : सासरच्या लोकांनी सातत्याने केलेल्या छळामुळे एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुलगा होत नसल्याच्या कारणावरुन आणि माहेरहून 50 तोळे सोने आणण्यासाठी तिचा अनेक वर्षांपासून मानसिक आणि शारीरिक छळ सुरु होता. आरती जाधव असे 37 वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. ती मूळची पलूस येथील रहिवासी असून विवाहानंतर तामिळनाडू राज्यातील नागापट्टीनम येथे वास्तव्यास होती. याप्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकरा वर्षांपासून शारीरिक आणि मानसिक छळ

पलूस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे 74 वर्षीय वडील सुभाष कदम यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांची मुलगी आरती हिचा प्रशांत आनंदराव जाधव याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर आरती ही पतीसह तामिळनाडू राज्यातील नागपट्टीनम येथे वास्तव्यास होती. फिर्यादीनुसार, फेब्रुवारी 2015 पासून ते 23 मे 2026 पर्यंत आरोपींकडून आरतीचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत होता. 

हे ही वाचा : पुणे : IT इंजिनिअर मुलीचे चप्पल विक्रेत्यासोबत प्रेमसंबंध.. शेवटी नदीपात्रात मृतदेह सापडला!

'तुला मुलगा होत नाही..'

'तुला मुलगा होत नाही' तसेच 'माहेरहून सोने आण' या कारणांवरून तिला वारंवार टोमणे मारणे, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे तसेच मारहाण करणे असे प्रकार सुरू होते. विशेषतः पती प्रशांत जाधव व सासू रूपा जाधव यांनी मारहाण करून छळ केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच या फिर्यादीत आरतीच्या मृत्यूचे कारण हे तिला दिला जाणारा सततचा मानसिक व शारीरिक त्रास असे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी प्रशांत आनंदराव जाधव, रूपा आनंदराव जाधव (दोघे रा. मंगरूळ ता. खानापूर, जि. सांगली) संध्या प्रकाश साळुंखे, प्रकाश जोतिराम साळुंखे, प्रतिक प्रकाश साळुंखे व शेजल प्रकाश साळुंखे  (चौघे रा. येळावी ता. तासगांव जि. सांगली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या नागपट्टीनम येथे वास्तव्यास आहेत.

हे वाचलं का?