नाशिक: नवऱ्याला जेवण आवडलं नाही, पतीनं गरम आमटी पत्नीच्या अंगावर ओतली..
Nashik Crime : नाशिक शहरातील कोणार्क नगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीने बनवलेले जेवण न आवडल्याने पतीने पत्नीच्या अंगावर गरम आमटी ओतली. या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभिररित्या भाजून निघाली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नीन नवऱ्यासाठी जेवणात आमटी बनवली अन्..
उकळत्या आमटीचे भांडे थेट पत्नीच्या अंगावर
Nashik Crime : नाशिक शहरातील कोणार्क नगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीने बनवलेले जेवण न आवडल्याने पतीने पत्नीच्या अंगावर गरम आमटी ओतली. या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभिररित्या भाजून निघाली होती. घटनेनंतर पीडितेच्या तक्रारीनंतर नाशिक शहरातील अडगाव पोलीस ठाण्यात तिचा पती आणि चिथावणीखोर सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, 34 वर्षीय महिलेनं या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हे ही वाचा : सोलापूर : रीलस्टार विवाहिता स्वत:च्या हॉटेलच्या स्वयंपाकघरात गेली, अन् सर्वांची झोप उडाली
पत्नीन नवऱ्यासाठी जेवणात आमटी बनवली अन्..
पीडित महिला कोणार्क नगरच्या रूक्मिणी लॉन्स परिसरात सासू आणि पतीसोबत राहत होती. पत्नीनं दररोज कोणती भाजी बनवावी याच संभ्रमातून जेवणासाठी आमटी बनवली होती. तिचा पती घरी परतला असता, तिने आमटी चांगली उकळून त्याच्या जेवणात वाढली होती. आमटी पाहून पतीच्या डोक्यात सनक गेली होती.
हे ही वाचा : निळ्या ड्रममधील मृतदेह कचऱ्यात, हातावर नेहा नावाचा टॅटू..
उकळत्या आमटीचे भांडे थेट पत्नीच्या अंगावर
दरम्यान, सासूनेही काहीतरी नवऱ्याला चढवून सांगितल्याचा आरोप आहे. पती-पत्नीमधील वाद आणखी वाढला. रागाने संतप्त झालेल्या आरोपी पतीने आधी आपल्या पत्नीला निर्दयपणे मारहाण केली आणि एवढ्यावर न समाधान मानता, त्याने उकळत्या आमटीचे भांडे थेट पत्नीच्या अंगावर ओतले. यानंतर पीडित महिला भाजली गेली. पीडितेला तात्काळपणे घटनास्थळी नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले, अशातच तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली.









