Maharshtra Weather Report: अरे बापरे मान्सून उशिरा येणार, पुढचे 10 दिवस अंगाची लाही-लाही

मुंबई तक

Maharashtra Heat Wave: विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड उष्णतेची लाट दिसून येत आहे. अशातच आता मान्सून देखील काही काळ लांबणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

google news

महाराष्ट्रात उष्णतेची लाट पहायला मिळत असून अनेक ठिकाणी दमट वातावरण असणार आहे. Upper Air Cyclonic Circulation मुळे मान्सूनवर परिणाम झाला आहे. सध्या (27 मे 2026) विदर्भात उष्णतेची ते अती उष्णतेची लाट (Heat Wave to Severe Heat Wave) काही ठिकाणी कायम आहे. ब्रह्मपुरीसारख्या ठिकाणी 47.2 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवले गेले आहे. नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आदी जिल्ह्यांत तापमान सामान्यपेक्षा 4-5 अंश जास्त आहे.

RMC नागपूरच्या 26 मे संध्याकाळीच्या अंदाजानुसार 27 आणि 28 मे रोजी विदर्भात काही ठिकाणी अती उष्णता (Severe Heat Wave) राहण्याची शक्यता आहे. दमट (humid) वातावरणामुळे हीट इंडेक्स जास्त असल्याने आरोग्याच्या दृष्टीने त्रास होऊ शकतो.

26 मे च्या प्रेस रिलीझनुसार Northern Limit of Monsoon (NLM) अद्याप केरळपर्यंत पूर्णपणे पोहोचलेला नाही. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पुढील 2-3 दिवसांत मान्सूनची आणखी प्रगती होण्याची शक्यता आहे. मान्सूनची सामान्य तारीख 1 जून आहे. पण यंदा त्याला पोहचण्यास थोडा विलंब होत आहे.