11 वर्षीय मुलगी भावाला उठवायला गेली अन्..., लाईट गेल्यावर घरात काय घडलं?

मुंबई तक

आरोपीने पीडितेच्या तोंडात रुमाल कोंबून आणि हात-पाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. ही संतापजनक घटना 13 मेच्या रात्री घडली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

11 वर्षीय मुलगी भावाला उठवायला गेली अन्...

point

लाईट गेल्यावर घरात काय घडलं?

Crime News : एका 11 वर्षीय चिमुरडीवर तिच्याच सख्ख्या चुलत्याने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडितेच्या तोंडात रुमाल कोंबून आणि हात-पाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. ही संतापजनक घटना 13 मेच्या रात्री घडली. पीडिता सहावीत शिकत असून, ती लहानपणापासून तिच्या आजोळी राहते. आपल्या लहान भावाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी ती दोन दिवसांपूर्वीच आपल्या मूळ घरी आली होती. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील ही घटना आहे.

घरात गेली पण...

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी म्हणजेच रात्री 8 च्या सुमारास परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता. यामुळे घरातील फॅन बंद झाल्याने सर्वांना गरम होत होते. या उकाड्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य घराबाहेर बसले होते. यावेळी आईने मुलीला घरामध्ये झोपलेल्या लहान भावाला उठवून बाहेर आणण्यासाठी पाठवले. मुलगा बाहेर आला, मात्र मुलगी बऱ्याच वेळपर्यंत बाहेर न आल्याने संशय बळावला. घरात अंधाराचा फायदा घेऊन चुलत्याने मुलीला वाटेतच पकडले, तोंडात रुमाल कोंबला आणि दोरीने तिचे हात-पाय बांधून तिच्यावर अत्याचार केला. कोणाला काही सांगितल्यास जिवंत मारण्याची धमकीही त्याने दिली.

हे ही वाचा : पोटच्या मुलांचा विचारही केला नाही, आईने प्रियकरासोबत मिळून सगळंच संपवलं

प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

या भयंकर प्रसंगानंतर घाबरलेल्या चिमुरडीने रडत रडत बाहेर येऊन आईला सर्व हकीकत सांगितली. मात्र, समाजात होणारी बदनामी आणि कुटुंबातील मंडळींकडून आलेल्या दबावामुळे पीडितेच्या कुटुंबाने तब्बल 12 दिवस ही बाब दडवून ठेवली. या दरम्यान पीडितेला तातडीने परत तिच्या आजोळी पाठवून देण्यात आले. घटनेनंतर पीडित मुलगी अत्यंत मानसिक धक्क्यात होती, तसेच तिच्यावर झालेल्या अत्याचारामुळे तिला दुखापत झाली होती.

हे ही वाचा : माझा बॉयफ्रेंडही आपल्यासोबत राहणार, बायकोने ठेवली अट; पुढे काय घडलं?

पोटात तीव्र वेदना अन्...

सोमवारी (24 मे) अचानक पीडितेच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्याने कुटुंबाने तिला डॉक्टरांकडे नेले. तपासणीदरम्यान डॉक्टरांनी अंतर्गत दुखापतीची शंका व्यक्त करताच, आईने हिंमत दाखवून झाशी रोड पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत पीडितेची वैद्यकीय तपासणी केली आणि आरोपीविरुद्ध बलात्कार, पॉक्सो (POCSO) व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. ठाणे प्रमुखांनी तात्काळ विशेष पथक तयार करून आरोपी चुलत्याला अटक केली असून, पोलीस त्याची कसून चौकश करत आहेत.
 

हे वाचलं का?