तीन महिन्यांच्या मुलीला घेऊन पळाला बाप, शेवटी नाल्यात सापडला मृतदेह

मुंबई तक

एका जन्मदात्या बापाने आपल्या अवघ्या तीन महिन्यांच्या निष्पाप मुलीला नाल्यात फेकून तिची कथितपणे हत्या केली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

तीन महिन्यांच्या मुलीला घेऊन पळाला बाप,

point

शेवटी नाल्यात सापडला मृतदेह

Crime News : माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. येथे एका जन्मदात्या बापाने आपल्या अवघ्या तीन महिन्यांच्या निष्पाप मुलीला नाल्यात फेकून तिची कथितपणे हत्या केली. याप्रकरणी तत्परतेने कारवाई करत पोलिसांनी सोमवारी (25 मे) आरोपी बापाला अटक केली आहे. पोलीस आणि सुरक्षा दलांनी संयुक्त मोहीम राबवून चिमुरडीचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढला आहे. हरियाणातील कर्नाल परिसरातील ही घटना आहे.

आरोपीला ठोकल्या बेड्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला तिचा बाप घेऊन गेल्याची माहिती मिळाल्यानंतर या संपूर्ण घटनेचा खुलासा झाला. तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली आणि अवघ्या काही तासांतच या गुन्ह्याची उकल केली. सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) रामलाल यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने पावले उचलत आरोपी वडिलांना बेड्या ठोकल्या.

हे ही वाचा : बीड : 12 दिवसांपूर्वी विवाह झालेल्या तलाठ्याची आत्महत्या, नेमकं काय घडलं?

मुलीला फेकले नाल्यात

या तपासकार्याची सविस्तर माहिती देताना एसएचओ रामलाल यांनी सांगितले, "अनिता नावाच्या महिलेच्या तीन महिन्यांच्या मुलीचे तिच्या पतीने अपहरण केल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. आम्ही तात्काळ संयुक्त मोहीम हाती घेतली आणि 3 ते 4 तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावला. आम्ही आरोपी बापाला अटक केली असून मुलीचा मृतदेह एका नाल्यातून जप्त केला आहे. आता मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येईल." या कुटुंबात गेल्या काही काळापासून अंतर्गत वाद आणि मानसिक तणाव सुरू असल्याचेही त्यांनी पुढे नमूद केले. आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

हे ही वाचा : रात्री सगळे गाढ झोपले, सकाळी चिमुकलीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग; कुणी केले अत्याचार?

पीडितेच्या आईने काय सांगितले?

दुसरीकडे, मृत मुलीची आई अनिता हिने आपल्या पतीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितले की, तिचा पती दारूच्या नशेत धुंद होऊन आला होता, त्याने बळजबरीने मुलीला तिच्याकडून हिरावून घेतले आणि नंतर तिची हत्या केली. या घटनेनंतर रडून रडून वाईट अवस्था झालेल्या अनिताने म्हटले, "तो एका वेगळ्या खोलीत राहत होता आणि मी माझ्या आई-वडिलांसोबत राहत होते. तो दारू पिऊन घरात घुसला, माझ्या मुलीला माझ्याकडून हिसकावून घेतले, तिची हत्या केली आणि तिला इथे फेकून दिले. त्याला कडकडात शिक्षा झालीच पाहिजे. माझी मुलगी फक्त तीन महिन्यांची होती."
 

हे वाचलं का?