रात्री सगळे गाढ झोपले, सकाळी चिमुकलीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग; कुणी केले अत्याचार?
UP Crime News: सकाळी मुलीच्या कपड्यांवरील रक्त पाहून पालकांच्या मनात शंका आली. यानंतर जेव्हा तिच्या आईने प्रेमाने आणि विश्वासाने विचारपूस केली, तेव्हा पीडितीने रडत-रडत तिच्यासोबत घडलेला सर्व भयानक प्रकार सांगितला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रात्री सगळे गाढ झोपले
सकाळी चिमुकलीच्या शरीरावर रक्ताचे डाग
कुणी केले अत्याचार?
Uttar Pradesh Crime News : एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुरडीला आपल्या घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या नराधमाने चिमुरडीला इतकी भीती घातली की, तिने भीतीपोटी घरी परतल्यावर कोणालाही काहीच सांगितले नाही आणि ती झोपी गेली. सकाळी उठल्यावर जेव्हा तिच्या पालकांनी तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग पाहिले, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. 25 मे रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली.
'...तर मारुन टाकेन'
उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद परिसरातील ही घटना आहे. सकाळी मुलीच्या कपड्यांवरील रक्त पाहून पालकांच्या मनात शंका आली. यानंतर जेव्हा तिच्या आईने प्रेमाने आणि विश्वासाने विचारपूस केली, तेव्हा पीडितीने रडत-रडत तिच्यासोबत घडलेला सर्व भयानक प्रकार सांगितला. आरोपीने रविवारी रात्री आठच्या सुमारास तिला घरात बोलावले होते आणि अत्याचार केल्यानंतर ‘जर कोणाला काही सांगितले, तर जीवे मारून टाकेन’, अशी धमकी दिली होती. यामुळे घाबरलेली पीडिता रात्रभर घरात शांत पडून होती.
हे ही वाचा : जनगणना अधिकाऱ्यांना बघताच सटकली, काही क्षणांतच झालं होत्याचं नव्हतं
आरोपीच्या आईने केली शिवीगाळ
मुलीकडून सगळा प्रकार समजल्यानंतर तिचे संतप्त पालक तक्रार घेऊन आरोपीच्या घरी गेले. मात्र, तिथे त्यांच्याशी योग्य संवाद साधण्याऐवजी आरोपीच्या आईने पीडितेच्या पालकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि वाद घातला. यानंतर कोणताही पर्याय न उरल्याने, पीडित बालिकेचे आई-वडील तिला सोबत घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी आरोपीविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा : मित्रानं कॉफी पाजली अन् सगळं आयुष्य उद्ध्वस्त, UPSC करणाऱ्या तरुणीसोबत काय घडलं?
आरोपी बालसुधारगृहात
पोलीस निरीक्षक अनुज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. कायदेशीर प्रक्रियेनंतर त्याला बाल गुन्हेगार न्यायालयात हजर करण्यात आले, जिथून न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची रवानगी आग्रा येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.










