आधी सांगितलं बायको पळाली, नंतर गर्लफ्रेंडच्या घरात.., नेमकं काय घडलं?

मुंबई तक

नवऱ्याने आधी पोलिसांना सांगितलं की, त्याची बायको घरातील दागिने घेऊन पळून गेलीये. मात्र काही दिवसांतच असं काही समोर आलं की सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

आधी सांगितलं बायको पळाली

point

नंतर गर्लफ्रेंडच्या घरात..

point

नेमकं काय घडलं?

Crime News : हरियाणातील गुरुग्रामच्या मानेसर परिसरातून अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. लग्न होऊन अवघे तीन महिने झालेल्या एका नवविवाहितेची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे ही हत्या तिच्या नवऱ्याने आणि त्याच्या प्रेयसीने केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. हत्येनंतर आरोपीने पोलिसांसह नातेवाईकांना फसवण्यासाठी रचलेला कट पाहून सर्वजण चक्रावून गेले आहेत.

'ती दागिने घेऊन पळाली'

मधु असे या दुर्दैवी मृत नवविवाहितेचे नाव असून, अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच तिचे लग्न झाले होते. मात्र, 21 मे रोजी ती अचानक संशयास्पद रित्या बेपत्ता झाली. ती बेपत्ता झाल्यानंतर आरोपी पतीने कारस्थान रचले. मधु घरातील सर्व मौल्यवान दागिने घेऊन पळून गेल्याचा दावा त्याने पोलीस आणि सासरच्या लोकांसमोर केला. सुरुवातीला सर्वांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु बरेच दिवस उलटूनही मधुचा कोणताही सुगावा न लागल्याने कुटुंबीयांचा संशय बळावला आणि त्यांनी पतीवर खोटे बोलत असल्याचा थेट आरोप केला.

हे ही वाचा : बुलढाण्यात बापानं चारही पोरांना विहिरीत फेकलं अन्... मन सून्न करणारी घटना

प्रेयसीच्या घरात काय दिसलं?

या प्रकरणाचा तपास करत असताना रविवारी पोलिसांचे एक पथक संशयाच्या आधारे आरोपीच्या प्रेयसीच्या खोलीवर पोहोचले. तिथे बाहेरून कुलूप लावलेले होते आणि सर्वत्र शांतता होती. पोलिसांनी तात्काळ त्या खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता, तिथे अत्यंत भयानक दृश्य पाहायला मिळाले. खोलीच्या बाथरूममधून तीव्र दुर्गंधी येत होती. पोलिसांनी बाथरूमचा दरवाजा उघडला तेव्हा तिथे मधुचा पूर्णपणे सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मृतदेहाची दुरवस्था पाहून तिची हत्या काही दिवसांपूर्वीच करण्यात आली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

हे ही वाचा : डोळ्यांवर अ‍ॅसिड ओतलं, त्याचं गुप्तांग चिरडलं; बाभळीच्या झाडावर... भयंकर कृत्य

नवरा अन् प्रेयसी फरार

नवऱ्याने आपल्या प्रेयसीच्या मदतीने अत्यंत थंड डोक्याने हा खून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी मानेसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत. लग्न अवघ्या तीन महिन्यांतच अशा भीषण शोकांतिकेत बदलेल, अशी कल्पनाही मधुच्या कुटुंबीयांनी केली नव्हती, त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे वाचलं का?