आपण विभागले जातो, तेव्हा आपण कमकुवत होतोच, मेळाव्यात मोहन भागवत असे का म्हणाले?

RSS Mohan Bhagwat Speect At Nagpur : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज 20 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे दसरा मेळावाच्या पार्श्वभूमीवर शस्त्रपूजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमासोबत आरएसएसचे शताब्दी वर्ष देखील साजरे करण्यात आले होते. मोहन भागवत यांनी नागपूर येथे शस्त्रपूजा देखील केली, यावेळी बोलताना उपस्थितांना संबोधित केले.

ADVERTISEMENT

RSS Mohan Bhagwat Speect At Nagpur
RSS Mohan Bhagwat Speect At Nagpur
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

बंगालचे राज नारायण बासू यांचा उल्लेख 

point

संत रविदास यांच्या योगदानाचे स्मरण

point

भारत हा विविधतेनं नटलेला देश 

RSS Mohan Bhagwat Speect At Nagpur : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज 20 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे दसरा मेळावाच्या पार्श्वभूमीवर शस्त्रपूजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमासोबत आरएसएसचे शताब्दी वर्ष देखील साजरे करण्यात आले होते. मोहन भागवत यांनी नागपूर येथे शस्त्रपूजा देखील केली. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपण जेव्हा केव्हा एकमेकांपासून विभागलो गेलो तेव्हा आपण कमकुवत होतो, यामागील नेमकं अर्थ भागवातांचा काय आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पुन्हा वारं फिरलं; दुहेरी संकट IMD चा अलर्ट

बंगालचे राज नारायण बासू यांचा उल्लेख 

भागवतांनी या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले की, त्यांनी बंगालचे राज नारायण बासू यांचा उल्लेख केला आणि म्हणाले की, ज्यांची आता 200 वी जयंती साजरी होत आहे. राज नारायण बसू यांनी देशी जत्रांच्या माध्यमातून लोकांना संस्कृती आणि ओळखीबाबत जागरुक करण्यासाठी हिंदू मेळावे सुरू केले होते. 

संत रविदास यांच्या योगदानाचे स्मरण

पुढे त्यांनी संत रविदास यांच्या योगदानाचे स्मरण करून भाष्य केले. ते म्हणाले की, जेव्हा देश परकीय आक्रमकांच्या हल्ल्यांचा सामना करत होता आणि लोकांवर सतत अत्याचार झाला होता, तेव्हा सर्व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा स्थितीत संत रविदास यांनी आपल्या धर्माशी निष्ठा, सामाजिक सलोखा आणि भक्तीचा संदेश दिला होता. आरएसएसच्या प्रमुखांच्या मते, संत रविदास यांनी आपल्या जीवनाचे उदाहरण देत समाजाला दिलासा दिला आणि लोकांचे मनधौर्य वाढवले होते. 

मोहन भागवत यांनी सांगितलं की, गेली 10 वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारताचा त्याची एक स्वतंत्र ओळख, संस्कृती आणि परंपरांच्या आधारावर एकसंध आणि सशक्त बनवण्यास कार्यरत आहे. स्वदेशीचाच स्वीकार करण्याबाबत मोहन भागवत म्हणाले. 

हे ही वाचा : Personal Finance: घरातली रिकामी खोली बनू शकते कमाईचं साधन!

भारत हा विविधतेनं नटलेला देश 

पुढे बोलताना भागवत म्हणाले की, भारतमातेला सर्वोच्च स्थान आहे. देशात विविध पंथ, प्रदेश, जाती, भाषा, खाद्य सवयी आणि चालीरिती आहेत, मात्र आता भारताने एकजुटीने पुढे येणे गरजेचे आहे. भागवत नंतर म्हणाले की, भूतकाळात एकजुटीने प्रगती केली आणि भविष्यात देखील केली जाईल. नंतर त्यांनी अंमली पदार्थावर भाष्य केलं की, आजची पिढी अंमली पदार्थाच्या आहारी गेली आहे. ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे, त्यांनी पालकांना येणाऱ्या पिढीला याबाबत शिक्षित करण्याचे आवाहन केले.