सणाच्या सुट्टीत मामाच्या गावी गेला अन् मामीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापडला, मामाने भाच्यासोबत काय केलं?

कामावरुन सुट्टी मिळाल्यानंतर भाचा मामाच्या गावी गेला होता. मामा आणि भाच्याने मिळून मद्यप्राशन केले. त्यानंतर काही वेळाने भाचा मामीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळला. बांदा जिल्ह्यात ही घटना घडली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

भाचा मामीसोबत सापडला आक्षेपार्ह अवस्थेत

point

मामाने केली हत्या

point

नेमकं काय घडलं?

Crime News : सणात सहभागी होण्यासाठी गुजरातवरून आपल्या गावी आलेला 21 वर्षीय तरुण गावी पोहोचल्याच्या अवघ्या दोन दिवसांतच मृत पावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात ही घटना घडली असून, मृत तरुणाचा मृतदेह त्याच्याच घराच्या दरवाज्याबाहेर आढळल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाची काठीने बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली असून, याप्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मामीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण गुजरातमध्ये मजुरीचे काम करत होता आणि सणानिमित्त तो दोन दिवसांपूर्वीच गावी परतला होता. गावी आल्यानंतर तो त्याच्या मामाच्या घरी गेला, जिथे दोघांनी एकत्र मद्यप्राशन केले. काही वेळानंतर मामा गच्चीवर झोपायला गेला आणि नंतर खाली आल्यावर त्याला आपल्या पत्नीसोबत तो तरुण आक्षेपार्ह स्थितीत आढळला. यावरून वाद विकोपास गेला आणि संतापलेल्या पतीने काठीने तरुणाला बेदम मारहाण केली, ज्यामुळे गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

हे ही वाचा : गडचिरोली : कंत्राटदाराकडून लाच घेताना रंगेहात पकडलं, भाजपचा नगरसेवक ACB च्या जाळ्यात

हत्येनंतर मामा फरार

हत्येनंतर आरोपीने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने मृतदेह त्या तरुणाच्या घराच्या दरवाज्याबाहेर फेकून दिला आणि दोघेही तिथून फरार झाले. सकाळी कुटुंबातील सदस्यांनी घराबाहेर मृतदेह पाहिल्यानंतर परिसरात एकच हलोकल्लोळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला असून, या प्रकरणात महिलेने बलात्काराचा आरोपही केला आहे.

हे ही वाचा : Govt Jobs : दहावी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी, सर्वोच्च न्यायालयात भरती सुरु; साठ हजारांहून अधिक पगार

'त्या' रात्री काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, नामनिर्देशित दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणामागील नेमके सत्य काय होते आणि त्या रात्री नक्की काय घडले, याचा कसून तपास सध्या पोलीस यंत्रणेकडून केला जात आहे.