डोळ्यांवर अॅसिड ओतलं, त्याचं गुप्तांग चिरडलं; बाभळीच्या झाडावर... भयंकर कृत्य
Crime News : काही गुडांनी मिळून निष्पाप तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडून गुंडांनी संबंधित तरूणाच्या डोळ्यात अॅसिड हल्ला करत त्याचं गुप्तांग चिरडून टाकलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तरुणाच्या गुप्तांवर काठीने हल्ला
बाभळीच्या झाडाला लटकलेल्या स्वरुपात आढळला मृतदेह
Crime News : उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये गुंडांनी तरूणाची निर्घृणपणे हत्या केली आहे. आरोपीने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडून गुंडांनी संबंधित तरूणाच्या डोळ्यात अॅसिड हल्ला करत त्याचं गुप्तांग चिरडून टाकलं. या प्रकरणातील मृताची ओळख पुत्तन यादव अशी समोर आली. मृताचे कुटुंब शोकसागरात बुडाले आहेत.
हे ही वाचा : बायकोचा भाच्यावर जीव, नवऱ्याला करंट दिला, विष पाजलं.. पुढं भयंकर घडलं
तरुणाच्या गुप्तांवर काठीने हल्ला
घडलेल्या वृत्तानुसार, थारियानव पोलीस ठाण्याच्या हान्सवा परिसरात समाजकंटकांनी तरुणाला जंगला नेले, डोळ्यांत अॅसिड ओतले. माणुसपणाच्या सर्व मर्यादा त्याने ओलांडल्या असून मारेकऱ्यांनी तरुणाच्या गुप्तांवर काठीने हल्ला करत चिरडलं, नंतर त्याला बाभळीच्या झाडाला लटकवले होते.
बाभळीच्या झाडाला लटकलेल्या स्वरुपात आढळला मृतदेह
या प्रकरणात रामभवन यांचा मुलगा पुत्तन यादव काल रात्री 10 वाजता जेवणानंतर घरातून बाहेर पडला, मात्र पुन्हा परतला नाही. दुपारी गावापासून किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या एका शेतात गुरे चारण्यासाठी आलेल्या गुराख्यांना पुत्तन यादवचा मृतदेह बाभळीच्या झाडाला लटकलेल्या स्वरुपात आढळून आला होता. या प्रकरणा कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली होती.
हे ही वाचा : अशा मित्रापेक्षा शत्रू बरा! जिगरी मित्राच्या बायकोवर नजर,..शेवटी काय घडलं?
मयत तरुण पुत्तनचा भाऊ सुनील कुमार आणि त्याचा भाचा करण यादव यांनी आरोप केला की, ग्राम नगरसेवक त्यांच्या भावाच्या डोळ्यात अॅसिड ओतून, त्याचं गुप्तांग चिरडून नंतर स्कार्फने झाडाला लटकवून त्याची हत्या केली. या प्रकरणी आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









