बुलढाण्यात बापानं चारही पोरांना विहिरीत फेकलं अन्... मन सून्न करणारी घटना
Buldhana crime : बुलढाणा जिल्ह्यात मन सून्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, जिथे विहिरीत पाच मृतदेह आढळून आले आहेत. जिल्ह्यातील जामोद पोलीस ठाणे परिसरातील भाले अंजन गावाजवळ एका विहिरीत पाच मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती समोर आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पती-पत्नीत झालेल्या वादातून दुर्दैवी घटना
पोटच्या चारही लेकरांना विहिरीत फेकलं
Buldhana Crime : जका खान - बुलढाणा जिल्ह्यात मन सून्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, जिथे विहिरीत पाच मृतदेह आढळून आले आहेत. जिल्ह्यातील जामोद पोलीस ठाणे परिसरातील भाले अंजन गावाजवळ एका विहिरीत पाच मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचले होते. जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे अधिकारी नितीन पाटील यांनी आज तक या वृत्तमाध्यमाशी बोलताना माहिती दिली.
हे ही वाचा : Pune crime : भररस्त्यात पीडितेला गुप्तांग दाखवून.. लाज आणणारी घटना
पती-पत्नीत झालेल्या वादातून दुर्दैवी घटना
नितीन पाटील म्हणाले की, पती-पत्नीत झालेल्या वादातून ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृत पती विजय मुसा किरडिया आणि पत्नी यांच्यात सातत्याने वाद होत होता. काही दिवसांपूर्वीच त्याने पत्नीला तिच्या माहेरी सोडले आणि मुलांसोबत एकटा राहत होता. अचानक सकाळी विहिरीत पाच मृतदेह आढळून आले होते.
पोटच्या चारही लेकरांना विहिरीत फेकलं
याच मृतदेहांवरून अंदाज लावण्यात आला की, रविवारी वडिलांनी प्रथम आपल्या 7, 5, 4 आणि 2 वर्षाच्या मुलांना विहिरीत फेकून दिलं, नंतर विहिरीतून पाणी काढण्याच्या लाकडाला गळफास घेत आपलं जीवन संपवलं. पोलिसांनी मृतदेह ग्रामीण रूग्णालयात पाठवला. जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आणि तपास सुरू ठेवला.
हे ही वाचा : डोळ्यांवर अॅसिड ओतलं, त्याचं गुप्तांग चिरडलं; बाभळीच्या झाडावर... भयंकर कृत्य
संबंधित प्रकरणात अनेकदा दिसून आले की, नवरा-बायकोमधील वादामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कौटुंबिक वादातूनच हे प्रकरण घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.









