Pune crime : भररस्त्यात पीडितेला गुप्तांग दाखवून.. लाज आणणारी घटना
Pune crime : पुण्यात लाज आणणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चिंचवड परिसरात कामावर जाण्यासाठी बस स्टॉपवर थांबलेल्या एका 24 वर्षीय महिलेसोबत अश्लील आणि विनयभंगाचा विचित्र प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपी बाउन्सर आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तरूणाने पँटची चैन खोलून पीडितेला गुप्तांग दाखवून...
आरोपीचं कृत्य मोबाईलमध्ये केलं कैद
Pune Crime : पुण्यात लाज आणणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चिंचवड परिसरात कामावर जाण्यासाठी बस स्टॉपवर थांबलेल्या एका 24 वर्षीय महिलेसोबत अश्लील आणि विनयभंगाचा विचित्र प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपी बाउन्सरच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही लज्जास्पद घटना 21 मे रोजी सकाळी, चिंचवडमधील मदर तेरेसा फ्लायओव्हरजवळील एम्पायर इस्टेट बीआरटी बस स्टॉपवर घडली होती.
हे ही वाचा : डोळ्यांवर अॅसिड ओतलं, त्याचं गुप्तांग चिरडलं; बाभळीच्या झाडावर... भयंकर कृत्य
तरूणाने पँटची चैन खोलून पीडितेला गुप्तांग दाखवून...
महिला तिच्या कंपनीच्या खासगी बसची वाट पाहत होती. तिथे आधीच बसलेल्या झाकीर हमीद शेख नावाचा व्यक्ती तिच्याकडे एकटक पाहत होता. इतक्यातच त्या हमीद खानने पँटची चैन खोलून गुप्तांग उघडे केले, नंतर तिच्या दिशेने अश्लील हावभाव करण्यास सुरूवात केली, असा आरोप आहे.
पीडितेनं धाडस दाखवून आरोपीचं कृत्य मोबाईलमध्ये केलं कैद
या लज्जास्पद कृत्याने महिला भयभीत झाली, तिने हिम्मत करून तात्काळ मोबाईल काढला आणि आरोपीच्या कृत्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, इतक्यात आरोपीने घटनास्थळावरून धाव घेतली. घटनास्थळावरून पळून जाताना आरोपीने कपडे देखील बदलले होते.
हे ही वाचा : मुंबई : मरिन ड्राईव्हवर थरार, गाडी थांबवण्याचा इशारा पण मर्सिडिजने दोन पोलिसांना चिरडलं!
पीडित महिला ही पिंपरी पोलीस ठाण्यात गेली आणि तिने तक्रार दाखल केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आणि सुमारे 70 ते 80 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यानंतर त्यांनी आरोपी झाकीर हमीद शेख याला अटक देखील केली. पुण्यासारख्या शहारत दिवसाढवळ्या घडलेल्या अशा घटनेनं शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.









