Govt Jobs : भारत सरकारच्या 'या' कंपनीत भरती सुरु, महिना 1 लाख 20 हजार रुपये पगार!

मुंबई तक

NGEL या भारत सरकारच्या कंपनीत भरती सुरु झाली आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंग उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना ही सुवर्णसंधी आहे. यासाठी पात्रतेचे निकष काय आहेत, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

NGEL Recruitment
NGEL Recruitment
Google CTA

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : भारत सरकारच्या 'या' कंपनीत भरती सुरु

point

महिना 1 लाख 20 हजार रुपये पगार!

NGEL Recruitment : भारत सरकारच्या अग्रगण्य एनटीपीसी लिमिटेड (NTPC Limited) ची उपकंपनी असलेल्या 'एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड' (NGEL) मध्ये विविध पदांवर भरती जाहीर झाली आहे. यामध्ये एकूण ११४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. असिस्टंट इंजिनिअर पदाच्या 100 जागा आणि डेप्युटी जनरल मॅनेजर पदाच्या 14 जागांचा समावेश आहे. रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

शैक्षणिक पात्रता काय?

या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. शैक्षणिक पात्रतेचा विचार केल्यास, असिस्टंट इंजिनिअर दासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित शाखेतील (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन इ.) उत्तीर्ण डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तर 'डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी 60% गुणांसह इंजिनिअरिंगची पदवी असणे अनिवार्य आहे. 

हे ही वाचा : मुंबई: टिव्ही अभिनेत्याला अटक, 16 वर्षीय मुलीचा छळ केल्याचा आरोप

अनुभवाची अट

दोन्ही पदांसाठी आवश्यक असलेला कामाचा अनुभव अत्यंत महत्त्वाचा आहे. असिस्टंट इंजिनिअर पदासाठी पॉवर सेक्टरमधील किमान 10 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे, तसेच, डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी पॉवर सेक्टरमध्ये एकूण 12 वर्षांचा एक्झिक्युटिव्ह कॅडरमधील अनुभव आवश्यक आहे. सरकारी किंवा पीएसयू (PSU) मधील उमेदवारांसाठी ई-5 ग्रेडमधील 2 वर्षांच्या अनुभवाची अतिरिक्त अट लागू असेल.

हे ही वाचा : मटनाची आस लावून बसले, पण वाढलं चिकन, भर लग्न मंडपात तुफान हाणामारी

वेतन किती मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांना या केंद्रीय सार्वजनिक उपक्रमात अतिशय उत्कृष्ट वेतनश्रेणी आणि भत्ते मिळणार आहेत. असिस्टंट इंजिनिअर पदासाठी 30,000 ते 1,20,000 रुपये ही वेतनश्रेणी असून सुरुवातीचे मूळ वेतन 40,000 असेल. तर 'डेप्युटी जनरल मॅनेजर' पदासाठी 90,000 ते 2,40,000 ही उच्च वेतनश्रेणी असून सुरुवातीचे मूळ वेतन 90,000 रुपये असेल, सोबतच महागाई भत्ता आणि इतर भत्ते कंपनीच्या नियमानुसार मिळतील. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्जासाठी www.ngel.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
 

हे वाचलं का?