बायकोला प्रेयसीच्या घरी नेलं, अन् सासऱ्यांना सांगितली 'ती' गोष्ट, भयंकर कांड उघडकीस
Crime News : पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह प्रेयसीच्या भाड्याच्या खोलीतील बाथरुममध्ये लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला अवघ्या एका वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला असताना पतीनेच आपल्या प्रेयसीच्या मदतीने हे अमानवीय कृत्य केल्याचे उघड झाले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बायकोला प्रेयसीच्या घरी नेलं
अन् सासऱ्यांना सांगितली 'ती' गोष्ट, भयंकर कांड उघडकीस
Crime News : मधू नावाच्या 22 वर्षीय विवाहितेची तिच्याच पतीने निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह त्याच्या प्रेयसीच्या भाड्याच्या खोलीतील बाथरूममध्ये लपवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मधू आणि अंकित भगत यांचे लग्न अवघ्या एका वर्षापूर्वीच झाले होते, परंतु अंकितचे दुसऱ्या एका तरुणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांमुळे त्यांच्या सुखी संसाराला गालबोट लागले. 21मे रोजी मधु अचानक बेपत्ता झाली आणि तेव्हापासूनच तिच्या माहेरच्या मंडळींनी शोधाशोध सुरू केली होती. अंकित आणि त्याच्या नातेवाईकांनी मधू दागिने घेऊन पळून गेल्याची खोटी कहाणी रचून सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र शेवटी सत्य समोर आलेच.
हेही वाचा : प्रपोज केल्यानंतर तरुणीने नकार दिला, तरुणाच्या पचनी पडेना; थेट घरावर पेट्रोल बॉम्ब टाकला
शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे खुनाचा थरार उघड
मधूचे वडील अशोक यांनी अंकितवर संशय व्यक्त करून पोलिसांत धाव घेतली होती. पोलिसांनी तपास सुरू करताच अंकित 22 मे पासून गायब झाला. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, अंकितने मानेसर बस स्टँडजवळ दोन वर्षांपासून एक खोली भाड्याने घेतली होती, जिथे तो एका तरुणीसोबत लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. 22 मे रोजी रात्री स्थानिक लोकांनी अंकित आणि त्याच्या प्रेयसीला घाईघाईने त्या खोलीतून पळून जाताना पाहिले होते. रविवारी त्या खोलीतून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बाथरूमची पाहणी केली असता, तिथे मधुचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. आरोपी पती अंकित आणि त्याची प्रेयसी या दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता त्यांच्या मागावर आहेत.
हेही वाचा : मित्रानं कॉफी पाजली अन् सगळं आयुष्य उद्ध्वस्त, UPSC करणाऱ्या तरुणीसोबत काय घडलं?









