'त्यांनी मला 50 हजारांना विकल्यानंतर माझ्यासोबत...' नवऱ्याने विक्री केलेल्या बायकोने काय सांगितलं?

मुंबई तक

एका पतीनेच आपल्या काही साथीदारांच्या मदतीने स्वतःच्या पत्नीला केवळ 50 हजार रुपयांना अनोळखी व्यक्तींना विकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर तिच्यासोबत भयानक प्रकार घडला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

'त्यांनी मला 50 हजारांना विकले'

point

नवऱ्याने विक्री केलेल्या बायकोने काय सांगितलं?

Crime News : गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूरमधून मानवी तस्करी आणि लैंगिक अत्याचाराची एक थरारक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीनेच आपल्या काही साथीदारांच्या मदतीने स्वतःच्या पत्नीला केवळ 50 हजार रुपयांना अनोळखी व्यक्तींना विकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या दुर्दैवी महिलेला आरोपींनी डांबून ठेवून तिच्यावर पाशवी अत्याचार केले, तसेच तिचे दागिनेही जबरदस्तीने काढून घेत ते विकून टाकले. याप्रकरणी पालनपूर पश्चिम पोलिसांनी पीडितेचा पती निकेश पटेल याच्यासह एकूण सात जणांना अटक केली असून संपूर्ण परिसरात या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांना का आला संशय?

या भीषण गुन्ह्याचा खुलासा पोलिसांच्या चाणाक्ष तपासामुळे झाला. आरोपी पती निकेश पटेल याने 11 मे रोजी आपली पत्नी पालनपूर शहरातून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती. मात्र, तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत निकेश स्वतः देखील अचानक बेपत्ता झाला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी पालनपूर पूर्व पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची दुसरी तक्रार दिली. एकापाठोपाठ एक घडलेल्या या संशयास्पद घडामोडींमुळे पोलिसांना संशय आला. पोलीस उपअधीक्षक जिग्नेश गामित यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन तक्रारींमधील गूढ वाढल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि पती-पत्नी दोघांचा शोध घेतला.

हे ही वाचा : Sunil Tatkare यांच्या प्रश्नाने छगन भुजबळ का संतापले? NCP च्या बंद दाराआडच्या बैठकीची इनसाईड स्टोरी

पीडितेने सांगितला भयानक प्रसंग

पोलिसांनी शोध घेतल्यानंतर पीडित महिला आणि तिचा पती पोलिसांच्या हाती लागले. जेव्हा पोलिसांनी पीडितेची सखोल चौकशी केली, तेव्हा तिने तिच्यावर बेतलेला भयानक प्रसंग कथन केला. पीडितेने सांगितले की, तिचा पती निकेश याने संजय ठाकोर, अशोक ठाकोर आणि सचिन दरबार या आपल्या साथीदारांच्या संगनमताने तिला पैशांसाठी विकण्याचा कट रचला होता. या टोळीने तिला 50 हजार रुपयांना दुसऱ्या व्यक्तींकडे विकले. या मानवी तस्क्रीनंतर तिला डांबून ठेवण्यात आले आणि तिच्यावर वारंवार बलात्कार करून लैंगिक छळ करण्यात आला. इतकेच नव्हे तर आरोपींनी तिच्या अंगावरील दागिनेही जबरदस्तीने हिसकावून घेत स्थानिक सराफांना विकले.

हे ही वाचा : 'तू मला का बोललास?' अल्पवयीन मुलाने अंगावर गाडी घालून चिरडले, पोलिसांनी कसे पकडले?

मानवी तस्करीचे रॅकेट?

पीडितेच्या या अत्यंत गंभीर जबाबाच्या आधारे पालनपूर पश्चिम पोलिसांनी सामूहिक बलात्कार, मानवी तस्करी, गुन्हेगारी कट रचणे आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करत मुख्य संशयित पतीसह सातही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस तपासात मुख्य आरोपी निकेश पटेल याचा पूर्वेतिहासही गुन्हेगारी स्वरूपाचा असल्याचे समोर आले आहे. तो आधीच विवाहित असतानाही यापूर्वी त्याने अनेक मुलींना आमिष दाखवून त्यांचे अपहरण केल्याचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस आता या संपूर्ण मानवी तस्करीच्या रॅकेटचा, पीडितेच्या दागिन्यांच्या विक्रीचा आणि या गुन्ह्यात सामील असलेल्या प्रत्येक आरोपीच्या नेमक्या भूमिकेचा सखोल तपास करत आहेत.

हे वाचलं का?