नात्याला काळिमा! कल्याणमध्ये बापाने लेकीला देखील सोडलं नाही, तिच्यावर...
Kalyan Crime : कल्याण पश्चिमेत दुधनाका परिसरात नात्याला वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. वडिलांनी मुलीवर टोकदार शस्त्रने हल्ला करत संपवलं. या संतापजनक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नात्याला काळिमा फासणारा प्रकार
वडील आणि मुलीत किरकोळ कारणावरून वाद
Kalyan Crime : कल्याण पश्चिमेतील दुधनाका परिसरात वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. वडिलांनी मुलीवर टोकदार शस्त्राने हल्ला करत संपवलं. या संतापजनक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरणात मृत मुलीचा गायत्री शिंदे (वय 25) अशी ओळख समोर आली, तर वडिलांची विनोद वसईकर (वय 50) अशी ओळख समोर आली. या घटनेनं परिसर हादरून गेला.
हे ही वाचा : भयंकर! आंबे आणण्यासाठी मुलगी गेली, तोंडात कापड अन् नग्नवस्थेत...
वडिलांनी मुलीवर टोकदार शस्त्राने हल्ला करत संपवलं
घडलेल्या घटनेनुसार, गायत्री आणि वडील विनोद यांच्यात किरकोळ कारणावरून मोठा वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतप्त झालेल्या वडिलांनी टोकदार हत्याराने गायत्रीच्या कपाळावर सपासप वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत करण्याचा देखील प्रयत्न केला होता. मात्र, गंभीर दुखापतीमुळे गायत्रीचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर आरोपी विनोद वसईकर घटनास्थळावरून फरार झाला.
हे ही वाचा : जालना : दारूसाठी पैसे देण्यास नकार, मावस भावासोबत भयंकर..
या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन पथके पाठवली आहेत. या हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेनं कल्याण परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात आली. बापानेच मुलीची हत्या केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.









