'उत्पादन खर्चही निघत नाही..' कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उद्विग्न सवाल; काय आहेत व्यथा?
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. यातून मिळणाऱ्या परताव्यातून साधा उत्पादन खर्चही निघत नसल्याने ते उद्विग्न झाले आहेत.
ADVERTISEMENT
Onion farmers in Maharashtra : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या कमालीच्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत असताना, बाजारात मात्र कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी तोट्यात चालला आहे. सध्या कांद्याला जास्तीत जास्त प्रति किलो केवळ 14 रुपये इतकाच दर मिळत आहे.पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर या प्रसिद्ध कांदा बाजारपेठेतून 'मुंबई Tak'चे प्रतिनिधी ओमकार वाबळे यांनी शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधून सविस्तर आढावा घेतला आहे. "उत्पादन खर्चही निघत नसल्याने बँकेचे कर्ज आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा?" असा उद्विग्न सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. पाहा शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील हा सविस्तर ग्राउंड रिपोर्ट.





