बॉक्सर कोचनं 17 वर्षीय मुलीला खोलीत बोलावलं, चुकीचा स्पर्श करत चार महिने..

मुंबई तक

Crime News : एका बॉक्सर कोचने अल्पवयीन मुलीचे कथितरित्या लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पीडितीचं वय 17 वर्षे होते. या प्रकरणी बॉक्सिंग कोचविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन तरुणीच्या आईने या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

चार महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचा छळ

point

खासगी खोलीत बोलावून नको तेच..

Crime News : एका बॉक्सर कोचने अल्पवयीन मुलीचे कथितरित्या लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पीडितीचं वय 17 वर्षे होते. या प्रकरणी बॉक्सिंग कोचविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन तरुणीच्या आईने या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शुक्रवारी दुपारी संपंगीरामनगर पोलीस ठाण्यात एफआरआय दाखल करण्यात आली. हे प्रकरण कर्नाटकातील बंगळुरूमध्ये घडलं आहे. 

हे ही वाचा : Astrology : आजच्या दिवशी 'या' राशींना होणार आर्थिक लाभ, जाणून घ्या राशीभविष्य

चार महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचा छळ

आरोपी हा कस्तूरबा रोड परिसरातील खासगी बॉक्सिंग क्लबमध्ये कोच म्हणून काम करत होता. आरोपीवर गेल्या चार महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचा छळ केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला. तक्रारीनुसार कर्नाटकबाहेर नुक्त्यात झालेल्या एका क्रीडा स्पर्धेदरम्यान छळ झाला. 

खासगी खोलीत बोलावले, नंतर तिला चुकीचा स्पर्श केला

17 मे रोजी. पीडित मुलगी बॉक्सिंग स्पर्धेसाठी चेन्नईत असताना, प्रशिक्षकाने तिला कथितरित्या आपल्या खासगी खोलीत बोलावले, तिने येण्यास विरोध केला, मात्र तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली. तिला चुकीचा स्पर्श केला. तक्रारीत पुढे म्हटलं की, बंगळुरूतील एका स्टेडियममध्येही तिच्या चुकीचा स्पर्श केल्याच्या घटना आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेनं भीतीपोटी हा अत्याचार आपल्या कुटुंबापासून लपवला होता, प्रशिक्षकाने तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली, नंतर हे प्रकरण उघडकीस आणल्यास जीवे सोडले जाणार नाही अशी धमकी देखील दिली. 

हे वाचलं का?