दुष्काळात तेरावा महिना, पुणेकरांच्या खिशाला कात्री, 'एवढ्या' रुपयांनी महागला CNG
Pune News : आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धजन्यस्थिती असताना देशातील राज्यांमधील पेट्रोल आणि सीएनजीच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. अशातच आता पुणेकरांच्या खिशाला आणखी कात्री लागण्याची अधिक शक्यता आहे. पु्ण्यातील सीएनजीच्या दरात आणखी वाढ होणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुण्यात सीएनजीच्या किंमतीत दोन रुपयांनी वाढ
युद्धजन्यस्थितीचा सीएनजीच्या दरवाढीवरील परिणाम
पुण्याची गोष्ट : आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धजन्यस्थिती असताना देशातील राज्यांमधील पेट्रोल आणि सीएनजीच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. अशातच आता पुणेकरांच्या खिशाला आणखी कात्री लागण्याची अधिक शक्यता आहे. पु्ण्यातील सीएनजीच्या दरात आणखी वाढ होणार आहे. एमएनजीएन अर्थात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने दरवाढीची घोषणा केली, बुधवारी 27 मे 2026 च्या मध्यरात्रीपासूनच ही महत्त्वाची अपडेट समोर आली.
हे ही वाचा : सोलापूर हादरलं! दोन वर्षांच्या चिमुकल्यासह आईनं नको तेच... भयंकर घडलं
पुण्यात सीएनजीच्या किंमतीत दोन रुपयांनी वाढ
दरवाढीपूर्वी पुण्यात सीएनजीची किंमत ही प्रतिकिलो 92.25 रुपये इतरी होती. त्यानंतर त्या किंमतीत वाढ होईन किलो गॅससाठी 94.75 मोजावे लागणार आहे. म्हणजेच काय तर किंमतीत 2 रुपयांची वाढ झाली आहे. ही दरवाढ पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या भागांना लागू होणार आहे. गॅसवरील खर्चात अधिक वाढ झाल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे एमएनजीएल यांनी सांगितलं आहे.
युद्धजन्यस्थितीचा सीएनजीच्या दरवाढीवरील परिणाम
दरम्यान, महत्त्वाचं म्हणजे इराण- अमेरिकेतली सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमळे इंधनात दरवाढ होऊन नागरिकांना झळा सोसाव्या लागण्याची शक्यता आहे. 9 मे 2026 रोजी सीएनजीचे दर हे प्रति किलो 1.50 रुपये होती, मात्र आता 2 रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून येते.
हे ही वाचा : पुणे : IT इंजिनिअर मुलीचे चप्पल विक्रेत्यासोबत प्रेमसंबंध.. शेवटी नदीपात्रात मृतदेह सापडला!
26 मे 2026 रोजी सीएनजी दरात 1 रुपयांनी दर वाढला. नंतर 28 मे रोजी अडीच रूपये इतकी दरवाढ करण्यात आली. 8 ते 9 मे दरम्यान पुण्यातील सीएनजीचा दर हा प्रति किलो 90.75 रुपये इतके होते, आता 94.75 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच जवळपास रुपयांनी सीएनजीच्या किंमतीत दरवाढ झाली आहे. यामुळे आता पुणेकरांच्या खिशावरील बोजा वाढण्याची शक्यता आहे.









