बुलढाणा : शिवानीचा मर्डर केला म्हणून तिचे वडील अन् भाऊ तुरुंगात, पण ती जिवंत निघाली!
Buldhana Crime News : बुलढाणा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी शिवानी नावाच्या तरुणीची हत्या केल्याप्रकरणी तिच्या वडिलांना आणि भावाला अटक केली होती. मात्र, ती तरुणी जिवंत असल्याचं समोर आलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बुलढाणा : शिवानीचा मर्डर केला म्हणून ...
तिचे वडील अन् भाऊ तुरुंगात, पण ती जिवंत निघाली!
Buldhana Crime News, जका खान : काही दिवसांपूर्वी बुलढाणा पोलिसांनी एका शिवानी नावाच्या तरुणीला मृत घोषित केलं होतं. पोलिसांनी तिचा मर्डर झाल्याचं सांगितलं आणि हत्येप्रकरणी शिवानीच्या वडिलांना आणि भावाला अटक झाली. त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. मात्र, आता तीच शिवानी नावाची तरुणी आता जिवंत अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आहे. नेमकं काय घडलंय? सविस्तर जाणून घेऊयात...
हेही वाचा : सरकारी कार्यालयातील महिलांच्या टॉयलेटमध्ये हिडन कॅमेरा.., अन् पुढे काय घडलं?
जळगाव जामोद तालुक्यात सापडलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा तपास करताना पोलिसांनी डीएनए रिपोर्ट येण्याआधीच हत्या प्रकरणाचा छडा लावल्याचा दावा केला होता व आपली पाठ थोपटून घेतली होती. हा मृतदेह शिवानीचा असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. मात्र आता संपूर्ण प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलं आहे.
हेही वाचा : सरकारी कार्यालयातील महिलांच्या टॉयलेटमध्ये हिडन कॅमेरा.., अन् पुढे काय घडलं?









