लातूर : तरुणीचे इन्स्टावर 32 हजार फॉलोवर्स, पण एका चुकीमुळे थेट तुरुंगात!
Latur Crime : लातूरमध्ये 'क्वीन रील स्टार' नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या 19 वर्षीय युवतीला पोलिसांनी कॉपर वायर चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लातूर : तरुणीचे इन्स्टावर 32 हजार फॉलोवर्स
पण एका चुकीमुळे थेट तुरुंगात!
Latur Crime : इंस्टाग्रामवर हजारोंच्या संख्येने फॉलोअर्स असलेल्या आणि स्वतःला 'क्वीन रील स्टार' म्हणून मिरवणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीला पोलिसांनी कॉपर वायर चोरीच्या गंभीर आरोपाखाली अटक केली आहे. आरोपी युवतीची ओळख प्रिया जितेंद्र कांबळे अशी पटली असून, ती इंस्टाग्रामवर सक्रिय होती. तिचे तब्बल 32 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. आपल्या रील्सच्या माध्यमातून तिने सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवली होती. मात्र, तिच्या अटकेची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्स असणारे लोकं पुरते हादरून गेले आहेत.
हेही वाचा : विधानपरिषद निवडणूक : महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर, कोण किती जागा लढणार?
कॉपर वायरची चोरी केल्याची कबुली
या कारवाईबाबत सविस्तर माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एका युवतीद्वारे निर्माणाधीन साइटवरून कॉपर वायरची चोरी केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीची दखल घेत पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने सापळा रचला आणि बुधवारी एका शाळेच्या परिसरातून संशयित प्रिया कांबळे हिला ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीमध्ये प्रियाने आपण प्रकाश नगर परिसरातील बुद्ध विहार जवळ असलेल्या एका निर्माणाधीन साइटवरून कॉपर वायरची चोरी केल्याची कबुली दिली आहे. चोरलेल्या या तारा ती स्थानिक भंगारच्या दुकानात विकत असे आणि त्यातून मिळालेले पैसे आपल्या चैनीसाठी वापरत होती, असे तपासात समोर आले आहे.
हेही वाचा : NCP सोडलेल्या नेत्याची 'त्या' पदावरील नेमणूक रोखा, सूनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र









