Govt Jobs : तुम्ही Ph.D करताय का? IIM मुंबईमध्ये कामाची सुवर्णसंधी

मुंबई तक

आयआयएम मुंबईने Management Trainee पदांच्या 10 जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 16 जून निश्चित करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Government Jobs
Government Jobs
google news

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : तुम्ही Ph.D करताय का?

point

IIM मुंबईमध्ये कामाची सुवर्णसंधी

Government Jobs : आयआयएम मुंबईने Management Trainee पदांच्या 10 जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 16 जून निश्चित करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला 1 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्त केले जाईल, जो कामगिरीनुसार पुढे आणखी 3 वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो. निवड प्रक्रियेची तारीख केवळ शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे कळवली जाईल.

शैक्षणिक पात्रता

या भरती अंतर्गत दोन प्रकारच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पहिल्या 'व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी' पदासाठी संबंधित क्षेत्रातील 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा बी.टेक (B.Tech) पदवी असणे आवश्यक आहे. दुसऱ्या 'व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (प्रशासन)' पदासाठी 60% गुणांसह कोणतीही पदव्युत्तर पदवी किंवा बी.टेक पदवीधारक पात्र असतील. ज्या उमेदवारांचे पीएच.डी (Ph.D) शिक्षण सुरू आहे किंवा जे पीएच.डी करण्याची इच्छा बाळगतात, त्यांना निवडीत प्राधान्य दिले जाईल. तसेच, उच्च शिक्षण संस्था, एडटेक कंपन्या, शैक्षणिक संशोधन किंवा विद्यार्थी समुपदेशन क्षेत्रातील अनुभव असलेल्यांना अतिरिक्त फायदा मिळेल.

हे ही वाचा : विधानपरिषद निवडणूक : महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर, कोण किती जागा लढणार?

इतके मिळणार विद्यावेतन

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 32 वर्षे ठेवण्यात आली आहे, मात्र पीएच.डी धारक आणि अनुभवी उमेदवारांसाठी ही मर्यादा 35 वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. याशिवाय, केंद्र सरकारच्या नियमांनुसार अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि दिव्यांग उमेदवारांना वयोमर्यादेत कायदेशीर सवलत लागू असेल. वेतनश्रेणीचा विचार केल्यास, निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा 35,000 ते 45,000 रुपयांपर्यंत मासिक विद्यावेतन (Stipend) दिले जाईल. यासोबतच दरमहा 8,000 रुपये घरभाडे भत्ता, 2,000 रुपये प्रवास भत्ता आणि 500 रुपये मोबाईल फोन खर्च दिला जाईल.

हे ही वाचा : NCP सोडलेल्या नेत्याची 'त्या' पदावरील नेमणूक रोखा, सूनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

'या' आहेत अटी

इतर महत्त्वाच्या अटींनुसार, या पदांसाठी केवळ भारतीय नागरिकच अर्ज करण्यास पात्र आहेत आणि शैक्षणिक पात्रतेच्या टक्केवारीमध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नाही. या नोकरीसाठी कामाची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 अशी असून, रविवार सोडून आठवड्यातून 6 दिवस काम करावे लागेल; संस्थेच्या गरजेनुसार सुट्टीच्या दिवशी किंवा अतिरिक्त वेळ काम करावे लागल्यास कोणताही अतिरिक्त भत्ता मिळणार नाही. निवड प्रक्रियेला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही, तसेच संस्थेकडून राहण्याची सोय पुरवली जाणार नाही. अधिक माहितीसाठी www.iimmumbai.ac.in या संकेतस्थळाला भेट द्या.
 

हे वाचलं का?