बुलढाणा : शिवानीचं बनावट हत्याकांड, आरोपी वडील अन् भावाची सुटका, पहिली प्रतिक्रियाही समोर
Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्यात ज्या तरुणीची हत्या केल्याच्या आरोपाखाली वडील आणि भावाला अटक करण्यात आली होती, तीच तरुणी जिवंत सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस तपासातील निष्काळजीपणा चव्हाट्यावर आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहा कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यांना हेड क्वार्टरला अटॅच करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बुलढाणा : शिवानीचं बनावट हत्याकांड,
आरोपी वडील अन् भावाची सुटका, पहिली प्रतिक्रियाही समोर
Buldhana Crime News, जका खान : बुलढाणा जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक आणि पोलीस प्रशासनाच्या तपास पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह दोन तुकड्यांत सापडला होता. या प्रकरणाचा तपास करताना बुलढाणा पोलिसांनी हा मृतदेह मध्यप्रदेशातील खकणार येथील बेपत्ता असलेल्या ‘शिवानी कळमेकर’ या तरुणीचा असल्याचा दावा केला होता. या हत्येप्रकरणी शिवानीचे वडील आणि भावावर संशय व्यक्त करून पोलिसांनी त्यांना अटक केली होती. न्यायाधीशांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे ते बुलढाणा कारागृहात बंद होते. मात्र, आता हे संपूर्ण प्रकरण एका वेगळ्याच वळणावर आले असून, मृत घोषित केलेली शिवानी स्वतः जिवंत अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आहे. तिने आपण जिवंत असल्याचे स्पष्ट केल्याने कारागृहात असलेल्या तिच्या वडील आणि भावाची आज (दि.30) निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
हेही वाचा : बार्शी : खेळपट्टी सपाट करण्यासाठी रोलर फिरवू लागले, 14 वर्षीय मुलगा खाली पडला अन्...
पोलीस तपासातील निष्काळजीपणा; अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा
या धक्कादायक प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी तातडीने पावले उचलली आहेत. डीएनए अहवाल येण्याआधीच आणि मृतदेहाची ओळख पटवण्याआधीच घाईघाईने हत्येचा गुन्हा नोंदवून निर्दोष व्यक्तींना तुरुंगात पाठवणाऱ्या दोन बड्या अधिकाऱ्यांसह सहा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एलसीबी ठाणेदार सुनील अंबुलकर, जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे आणि इतर तीन कर्मचाऱ्यांना मुख्यालयात (हेडक्वार्टर अॅटॅच) संलग्न करण्यात आले आहे. सुटकेनंतर शिवानीच्या वडिलांनी सांगितले की, मुलगी पळून गेल्याच्या संतापातून त्यांनी सुरुवातीला रागाच्या भरात खुनाचा गुन्हा कबूल केला होता, परंतु त्यांनी कोणाच्याही सांगण्यावरून हे केले नव्हते. तर दुसरीकडे, नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत की, वडिलांना जबरदस्तीने गुन्हा कबूल करायला भाग पाडले गेले.
हेही वाचा : मनोज जरांगेंचं रखरखत्या उन्हात उपोषण, काय आहे फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया?









