चकण्याला आंबा हवा होता, पण त्याआधीच अल्पवयीन मुलाचा जीव गेला, काय घडलं?

मुंबई तक

दारू पार्टीदरम्यान झालेल्या किरकोळ वादातून एका अल्पवयीन मुलाची तिघांनी बेदम मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

चकण्याला आंबा हवा होता

point

पण बॉडी सापडली वडाच्या झाडाखाली

point

अल्पवयीन मुलासोबत काय घडलं?

Crime News : दारू पार्टीदरम्यान झालेल्या किरकोळ वादातून एका अल्पवयीन मुलाची तिघांनी बेदम मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चकणा म्हणून आंबे तोडून आणण्याच्या कारणावरून हा वाद सुरू झाला होता. हत्येनंतर आरोपींनी मृतदेह एका वडाच्या झाडाखाली लपवून अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींसह एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील ही घटना आहे. 

वडाच्या झाडाखाली आढळला मृतदेह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 मे रोजी सकाळी एका वडाच्या झाडाखाली एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान मृताच्या मोठ्या भावाने सांगितले की, 24 मे रोजी सकाळी गावातील ऋषी डनसेना हा त्याच्या लहान भावाला कामासाठी सोबत घेऊन गेला होता. मात्र, तो रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह रक्ताळलेल्या अवस्थेत आढळून आला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मुलाची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हे ही वाचा : निवडणुकीसाठी 22 गुंठे जमीन विकली, पण पराभूत झाला, आता शिंदेंच्या निर्णयाने आनंद गगनात मावेना

'चकणा म्हणून आंबे'

संशयाच्या आधारे पोलिसांनी जेव्हा ऋषी डनसेनाची चौकशी केली, तेव्हा त्याने सांगितले की तो मृत मुलाला त्याचे मित्र चंद्रशेखर उर्फ चंदा, रघुनाथ उर्फ रघु सिंग आणि एका अल्पवयीन मुलाजवळ सोडून कामावर गेला होता. दरम्यान, ऋषीने चंद्रशेखरला फोन केला असता त्याला फोनवर मारहाण आणि ओरडण्याचा आवाज ऐकू आला होता, ज्यावर त्याने वाद मिटवण्यास सांगितले होते. या माहितीवरून पोलिसांनी तिन्ही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची स्वतंत्रपणे कसून चौकशी केली. या चौकशीत आरोपींनी आपला गुन्हा कबूल करत दारू पार्टीदरम्यान चकणा म्हणून आंबे तोडून आणण्यावरून वाद झाल्याचे सांगितले.

हे ही वाचा : प्रेयसीला स्मशानभूमीत नेऊन का संपवले? रजनीशच्या आयुष्यात काय घडलं?

बेदम मारहाण करत हत्या

हा वाद विकोपाला गेल्यानंतर तिन्ही आरोपींनी मिळून त्या अल्पवयीन मुलाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणी दरम्यान तो शेताच्या बांधावरून घसरून तलावाच्या बाजूला पडला आणि गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह उचलून वडाच्या झाडाखाली आणून ठेवला, जेणेकरून हा अपघात वाटावा. पोलिसांनी या प्रकरणात चंद्रशेखर उर्फ चंदा डनसेना, रघुसिंग उर्फ रघुनाथ राठिया आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली असून, घटनास्थळाची पुनर्रचना करून आरोपींचे कपडे जप्त केले आहेत. न्यायालयाने आरोपींची रवानगी तुरुंगात केली आहे.
 

हे वाचलं का?