सासूला घरात एकटं पाहिलं अन् चाकूने केले सपासप वार, सून का झाली क्रूर?
सासू घरी एकटीच असताना सुनेने आपल्या सासूवर चाकूने सपासप वार केले. सिकंदराबादमधील ही घटना असून यामागे नेमकं काय कारण आहे, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सासूला घरात एकटं पाहिलं अन् चाकूने केले सपासप वार
सून का झाली क्रूर?
Crime News : दीर्घकाळापासून सुरू असलेल्या संपत्तीच्या वादातून 33 वर्षीय सुनेने आपल्या 57 वर्षीय सासूवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवार, 21 जुलै रोजी सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला तत्परतेने अटक केली असून, पुढील कारवाई सुरू आहे. तेलंगणातील सिकंदराबादमध्ये घडलेली ही घटना आहे.
केस धरुन ओढले, चाकूने वार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला देवराई पद्मावती (वय 57) या आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावर एकट्याच असताना, त्यांची सून डी. विजयालक्ष्मी (वय 33) ही हातात स्वयंपाकघरातील चाकू घेऊन तिथे पोहोचली. विजयालक्ष्मीने पद्मावती यांचे केस धरून त्यांना ओढले आणि त्यांच्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात पद्मावती यांच्या मानावर आणि बोटांवर गंभीर दुखापत झाली आहे.
हे ही वाचा : आंदोलन मागे घेण्याची घोषणा, पण आधी सरकारला काय मान्य करावं लागलं?
शेजाऱ्यांनी केली मदत
पद्मावती यांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रसंगावधान दाखवत आरोपी विजयालक्ष्मीला पकडले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पद्मावती यांना तात्काळ गांधी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : 'माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, नाहीतर...' नुकत्याच रुजू झालेल्या शिक्षिकेसोबत काय घडलं?
आरोपी सुनेला अटक
तपासादरम्यान, सासू आणि सुनेमध्ये गेल्या काही काळापासून कौटुंबिक घराच्या मालकी हक्कावरून वाद सुरू असल्याचे निष्पन्न झाले, याच वादातून हा हल्ला करण्यात आल्याचा संशय आहे. याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल करत घटनास्थळाचा पंचनामा केला, फॉरेन्सिक पुरावे गोळा केले आणि हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त केला. पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपी सुनेला अटक करून न्यायालयात हजर केले, जिथून तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कौटुंबिक वाद हिंसेचा मार्ग न निवडता कायदेशीर मार्गाने सोडवावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
