मीरा भाईंदर: डब्ब्यात मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड, मनसे आक्रमक

मुंबई तक

Mira Bhayandar News : मीरा भाईंदरमध्ये मेथीची भाजी जेवणासाठी डब्ब्यात आणल्याने विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

ADVERTISEMENT

Mira Bhayandar News
Mira Bhayandar News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

point

मीरा-भाईंदर महापालिकेनं शाळेला कारणे दाखवा बजावली नोटीस

Mira Bhayandar News : प्रवीण नलावडे - मीरा भाईंदरमध्ये मेथीची भाजी जेवणासाठी डब्ब्यात आणल्याने विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. भाईंदरच्या तपोवन विद्यालयाला मीरा-भाईंदर महापालिकेनं शिक्षक विभागाने कारणे दाखवा अशी नोटीस बजावली होती. या प्रकरणाने विद्यार्थ्यांच्या आहारावर निर्बंध घालण्यात आले होते. याच मुद्द्यावरून आता वादाला तोंड फुटलं आहे. अशातच आता मीरा भाईंदर मनसेनं पालिकेकडे तक्रार केली आहे. 

हे ही वाचा : शाळेत प्रियकराने शिक्षिकेवर केला गोळीबार, नंतर स्वत:ला देखील संपवलं

मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

मनसेचे मीरा भाईंदरचे पदाधिकारी रॉबर्ट डिसोझा यांनी पालिकेकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यांनुसार, शाळेतील बहुतांश विद्यार्थी हे जैन धर्मातील असून शाळेत येताना डब्ब्यात मांसाहारी पदार्थ तसेच कंदमुळे असलेले पदार्थ आणू नये अशा सूचना पालकांना दिल्या जात आहेत. अशातच एका विद्यार्थ्याने मेथीची भाजी आणल्याने त्याला 50 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

मीरा-भाईंदर महापालिकेनं शाळेला कारणे दाखवा बजावली नोटीस

या तक्रारीची दखल घेत मीरा-भाईंदर महापालिकेनं शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शाळांना विद्यार्थ्यांच्या आहारावर निर्बंध लादता येणार नाही, असे त्या नोटीशीत नमूद करण्यात आले आहे. या कृत्यांमुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारांबाबत शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे, असे पालिकेनं आपले मत स्पष्ट केले आहे. 

हे ही वाचा : Astrology : पितृपक्षादरम्यान लक्ष्मी नारायण राजयोग, 4 राशींवर धनाचा वर्षाव

याआधी देखील असाच प्रकार 

दरम्यान, याआधी देखील मीरा रोड येथील एका शाळेत कांदा, लसूण आणि खाद्यपदार्थ डब्यात न आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. या प्रकरणात शिक्षण विभागाने नोटीस बजावली होती, नंतर याबाबत परिपत्रके मागे घेण्यात आले होते. शाळेच्या व्यवस्थापकाची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया याबाबत समोर आली नाही.