वर्दीला डाग, लग्नाचं आमिष दाखवून पोलिसाकडून तरुणीवर अत्याचार
Crime News : लग्नाचं आमिष दाखवून एका पोलीस अधिकाऱ्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस विभागाने आरोपी कॉन्स्टेबल विरोधात कारवाई केली. नंतर आरोपी कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलेले आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी काही पोलीस पथक शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लग्नाचे वचन देत पोलिसाकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार
आरोपी कॉन्स्टेबल तात्काळ निलंबित
Crime News : लग्नाचं आमिष दाखवून एका पोलीस अधिकाऱ्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस विभागाने आरोपी कॉन्स्टेबल विरोधात कारवाई केली. नंतर आरोपी कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलेले आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी काही पोलीस पथक शोध घेत आहेत. आरोपी फरार असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील आहेत.
हे ही वाचा : मंगळाचा मिथुन राशीत प्रवेश, 'या' राशींचे अच्छे दिन येणार
लग्नाचे वचन देत पोलिसाकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार
एका वृत्तमाध्यमानुसार, आरोपीची ओळख शैलेंद्र यादव अशी समोर आली आहे. जो उत्तर प्रदेश सेवेचा सदस्य अशी ओळख पटली. त्याच्यावर एका महिलेला लग्नाचे वचन देत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. नंतर तिने लग्नासाठी तगादा लावला तेव्हा त्याने लग्नास नकार दिला. संबंधित प्रकरणात पीडितेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आरोपी कॉन्स्टेबल तात्काळ निलंबित
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपीची ओळख शैलेंद्र यादव उपी-112 सेवेचा सदस्य असल्याची ओळख पटली होती. एका महिलेला त्याने लग्नाचे वचन दिले होते, असं सांगितलं मात्र, नंतर तिने शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप केला. नंतर पीडितेनं पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून देवरियाचे पोलीस अधीक्षक अभिजीत आर. शंकर यांनी आरोपी कॉन्स्टेबलला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले होते.
हे ही वाचा : "खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री इथेनॉलवर..",उद्धव ठाकरेंचा नितीन गडकरींवर प्रहार
निलंबन करताना शैलेंद्र यादव बरहाज पोलीस ठाणे परिसरात कार्यरत होता. तो मूळचा गाझीपूर जिल्ह्यातील आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील सिंह यांनी याबाबत सांगितलं की, पीडितेच्या तक्ररीच्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू ठेवण्यात आलाय.
