वाशिम: गणपतीच्या मूर्तीच्या पायथ्याला अश्लील व्हिडिओचा QR स्कॅनर, तिघांनी दिली कबुली
Washim Crime News : वाशिम जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यात तीन तरुणांनी लज्जास्पद कृत्य केल्याची घटना आहे. गणपतीच्या मूर्तीच्या पायथ्याला काही तरुणांनी अश्लील QR कोड लावून ठेवला होता. काही लोकांनी तो QR कोड स्कॅन देखील केला होता. त्यानंतर पॉर्न व्हिडिओची लिंक दिसली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गणपतीच्या मूर्तीच्या पायथ्याला लावला अश्लील व्हिडिओचा स्कॅनर
वाशिममध्ये लाज आणणारी घटना
Washim Crime News : जका खान - वाशिम जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यात तीन तरुणांनी लज्जास्पद कृत्य केल्याची घटना आहे. गणपतीच्या मूर्तीच्या पायथ्याला काही तरुणांनी अश्लील QR कोड लावून ठेवला होता. काही लोकांनी तो QR कोड स्कॅन देखील केला होता. त्यानंतर पॉर्न व्हिडिओची लिंक दिसली. यानंतर मंडळाच्या सदस्यांनी या घटनेची माहिती देण्यात आली असता, हा प्रकार उघडकीस आला.
हे ही वाचा : पुणे: देहूगावात आयटी इंजीनियरने 3 महिन्यांच्या गर्भवती महिलेला संपवलं, स्वत:ने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी
गणपतीच्या मूर्तीच्या पायथ्याला लावला अश्लील व्हिडिओचा स्कॅनर
वाशिम शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन प्रकरण समजून घेतले. पोलीस अधिकाऱ्यांसह पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले. 17 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास 2 मोटारसायकलवर तीन तरुण गणपतीच्या मंडपात आले होते. ज्यात एका तरुणाने गणपतीच्या मूर्तीच्या पायथ्याला स्कॅनर लावून ठेवला होता. त्यानंतर दुसरा तरुण गणपतीच्या मंडपात येताना दिसतो, नंतर ते दोघेही गाडीवर बसून घटनास्थळावरून निघून जातात.
तिघांनी कृत्याचा दिला कबुलीनामा
मंडळाच्या अध्यक्षाने पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अशातच एसपी निकेश खाटमोडे यांच्या नेतृत्वाखाली प्रकरणाचा पुढील तपास करण्यात आला होता. नंतर पथकाने पुढील तपास करत सीसीटीव्हीचा देखील तपास केला होता. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्हीत पोलिसांना तीन मुले आढळून आली होती. संबंधित तरुण ही अंदाजे 19 ते 20 वर्षांची आहेत. या प्रकरणात तिघांनाही पोलिसांनी अटक केली, नंतर त्यांनीच हे कृत्य केल्याचा कबुलीनामा दिला.
हे ही वाचा : नागपूर: मुलगी ऑनलाईन गेमच्या जाळ्यात, उत्तर प्रदेशात नेऊन लैंगिक अत्याचार
उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) रामेश्वर पवार यांनी सांगितले की, आरोपींनी पैसे कमावण्यासाठी QR कोड स्कॅनर बसवले होते. जो कोणी स्कॅनर स्कॅन करायचा, त्याला थेट टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील केले जायचे आणि त्यात अश्लील व्हिडिओ सुरू व्हायचे. स्कॅन केल्यानंतर आरोपींना 10 ते 15रुपये मिळायचे. या आरोपींनी पोलिसांना असेही सांगितले आहे की, शहरातील एका हनुमान मंदिराबाहेर आणि एका कॉलेजबाहेरही असेच स्कॅनर बसवण्यात आले होते.
