बाप मुलीच्या सासरी गेला अन् हादरलाच, सहा महिन्यांपूर्वीच सगळं संपलं होतं; दोषी कोण?

मुंबई तक

एका प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मुलीच्या मृत्यूची माहिती तिच्या माहेरच्यांना तब्बल सहा महिन्यांनी मिळाली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

बाप मुलीच्या सासरी गेला अन् हादरलाच

point

सहा महिन्यांपूर्वीच सगळं संपलं होतं

point

दोषी कोण?

Crime News : हुंडा देणे आणि घेणे याला कायद्याने बंदी आहे. मात्र हुंड्यामुळे छळ, आत्महत्या, हत्या असे अनेक प्रकार समोर येत असतात. असाच एक प्रकार समोर आला आहे. एका प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या वडिलांनी जावई, सासू-सासऱ्यांसह एकूण सहा जणांविरोधात हुंड्यासाठी छळ करून हत्या केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मुलीच्या मृत्यूची माहिती तिच्या माहेरच्यांना तब्बल सहा महिन्यांनी मिळाली. बिहारच्या माधेपुरा परिसरातील ही घटना आहे.

'असा' झाला विवाह

या घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की, कुमकुम कुमारी हिचा दिलरंजन कुमारसोबत प्रेमविवाह झाला होता. दोघांचे इंस्टाग्रामच्या माध्यमातून सूत जुळले होते. त्यांच्या प्रेमाला कुटुंबाचा विरोध होता. मात्र दोघांनी घरातून पळून जाऊन 24 एप्रिल 2024 रोजी एका मंदिरात विवाह केला आणि त्यानंतर कोर्ट मॅरेज केले. नंतर कुमकुमने व्हॉट्सॲपवर तिच्या विवाहाचे प्रतिज्ञापत्र वडिलांना पाठवले. मुलगी सज्ञान असल्याने तिच्या आनंदासाठी कुटुंबाने हा विवाह स्वीकारला. काही दिवसांनी मुलगी आणि जावयाला घरी बोलावण्यात आले, तसेच जावयाच्या आई-वडील आणि भावालाही आमंत्रित करण्यात आले. सामाजिक परंपरेनुसार मुलीला सन्मानपूर्वक सासरी पाठवण्यात आले. त्यानंतर मुलगी आणि जावयाचे येणे-जाणे सुरू होते.

हे ही वाचा : पुण्यात खळबळ! 12 जणांचा संशयास्पद मृत्यू, नेमकं कारण काय?

पत्नीला कर्करोग आणि आर्थिक चणचण

पीडित वडिलांनी सांगितले की, काही काळानंतर त्यांच्या पत्नीला कर्करोग (कॅन्सर) सारख्या गंभीर आजाराने ग्रासले, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब मानसिक आणि आर्थिक संकटात सापडले होते. यादरम्यान कुमकुमने आपल्या आजारी आईला भेटण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती, परंतु सासरच्या लोकांनी विविध कारणे सांगून तिला माहेरी येऊ दिले नाही. मृत विवाहितेच्या वडिलांनी आरोप केला आहे की, नोकरीचे कारण पुढे करून जावई आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्याकडून 1.80 लाख रुपये रोख आणि सुमारे 2.20 लाख रुपयांचे दागिने घेतले होते. एवढे देऊनही सासरच्या लोकांचे समाधान झाले नाही आणि ते सतत बुलेटची आणि 5 लाख रुपयांची मागणी करू लागले. ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी कुमकुमचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला.

हे ही वाचा : बुलढाणा : शिवानीचा मर्डर केला म्हणून तिचे वडील अन् भाऊ तुरुंगात, पण ती जिवंत निघाली!

सहा महिन्यांपूर्वी शेवटचा संवाद

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 डिसेंबर 2025 रोजी मुलीशी त्यांची शेवटचं बोलणं झालं होतं. त्यानंतर सासरच्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक ब्लॅकलिस्टमध्ये टाकला. दरम्यान, 22 एप्रिल 2026 रोजी कर्करोगाने ग्रस्त असलेल्या त्यांच्या पत्नीचे निधन झाले. याची माहिती त्यांनी मेसेजद्वारे मुलगी आणि जावयाला दिली, परंतु सासरच्या बाजूने कोणीही अंत्यसंस्काराला आले नाही. संशय आल्याने 24 मे रोजी जेव्हा वडील मुलीच्या सासरी पोहोचले, तेव्हा जावई घरात नव्हता.

हे वाचलं का?