मुंबईची खबर : भीषण अपघातानंतर 'बेस्ट' चालकांसंबंधी महत्त्वाचा निर्णय, जाणून घ्या सविस्तर

मुंबई तक

मुंबईतील बेस्ट चालकांसंबंधी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. बस चालवत असताना जर चालक मोबाईल वापरताना आढळून आला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : भीषण अपघातानंतर 'बेस्ट' चालकांसंबंधी महत्त्वाचा निर्णय

point

जाणून घ्या सविस्तर

Mumbai News : मुंबईच्या 'बेस्ट' चालकांच्या शिस्तीबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 'बेस्ट'चे अवघ्या 18 दिवसांत तब्बल 23 बस चालक गाडी चालवताना मोबाईल फोनचा वापर करताना पकडले गेले आहेत. या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हे वाढते उल्लंघन पाहता 'बेस्ट' प्रशासनाने आपल्या सुरक्षा मोहिमेची तीव्र करण्याची तयारी दर्शवली आहे.

यामुळे घेतला निर्णय

12 जून रोजी दादर येथील प्लाझा सिनेमाजवळ घडलेल्या भीषण बस अपघातानंतर ही धडक कारवाई सुरू झाली आहे. या अपघातात भरधाव वेगातील एका भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर सहा जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर बेस्ट प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि चालकांच्या बेशिस्तीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील सर्व 27 बस डेपोमध्ये आता अचानक तपासणी सत्रे आयोजित केली जात आहेत.

हे ही वाचा : विद्यार्थ्यांना मारहाणीचा आदेश कोणी दिला? राहुल गांधींच्या पत्रातून अमित शाहांना दोन तिखट सवाल

चालकांवर कोणती कारवाई होणार?

बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस चालवताना मोबाईल फोनचा वापर करणाऱ्या प्रत्येक चालकाला 1000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दुसऱ्यांदा असाच गुन्हा केल्यास दंड वाढवून 2000 रुपये केला जाईल. तर तिसऱ्यांदा नियम मोडल्यास संबंधित कंत्राटदार कंपनीविरुद्ध थेट चार्जशीट दाखल केली जाईल, ज्यामुळे खाजगी ऑपरेटर्सची जबाबदारी अधिक वाढणार आहे.

हे ही वाचा : "खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री इथेनॉलवर..",उद्धव ठाकरेंचा नितीन गडकरींवर प्रहार

'अशी' होणार तपासणी

रस्त्यावरील बेदरकारपणे गाडी चालवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि चालकांचे लक्ष विचलित होण्यापासून रोखण्यासाठी बेस्टने एक नवी रणनीती आखली आहे. यासाठी बेस्टचे अधिकारी आणि डेपो कर्मचारी आता साध्या कपड्यांमध्ये सामान्य प्रवाशांसारखा बसमधून प्रवास करत आहेत. हे गुप्त पथक चालकांच्या प्रत्येक हालचालीवर आणि सुरक्षेच्या नियमांवर बारीक लक्ष ठेवून असून, कोणतीही असुरक्षित किंवा बेजबाबदार पद्धत आढळल्यास त्याची तात्काळ नोंद घेऊन वरिष्ठांना अहवाल सादर करत आहे.