छत्रपती संभाजीनगर: 20 वर्षीय तरुणीला जॉर्जर इमारतीच्या छतावर नेत केली जबरदस्ती
Chhatrapati sambhajinagar crime : छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 20 वर्षीय तरुणीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तरुणीने विरोध करत आपला जीव वाचवला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात धक्कादायक प्रकार
20 वर्षीय तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न
Chhatrapati Sambhajinagar Crime : इसरारउद्दीन चिश्ती - छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 20 वर्षीय मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तरुणीने विरोध करत आपला जीव वाचवला. या घटनेदरम्यान बेगमपुरा पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे.
हे ही वाचा : तरुणाचा मेहुणीवर जीव, प्रेयसीला संपवलं अन् 10 किमी अंतरावर फेकला मृतदेह
घाटी रुग्णालयात गेलेल्या तरुणीवर दोघांकडून जबरदस्ती
या घटनेची माहिती मिळताच, 19 सप्टेंबर रोजी सकाळी डोळ्याच्या उपचारासाठी तरुणी ही घाटी रुग्णालयात जात होती. त्यावेळी दोन तरुणांनी पीडितेला रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने एका निर्जनस्थळी नेले होते. संबंधित प्रकरणात आरोपींची रोहन रिडलॉन आणि विशाल चावरिया अशी आरोपींची ओळख समोर आली आहे.
पीडितेनं हाताचा चावा घेत घटनास्थळावरून काढला पळ
संबंधित प्रकरणात आरोप केला की, आरोपींनी त्या तरुणीला जर्जर इमारतीच्या छतावर नेले आणि तिथे तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. अशातच पीडित तरुणीने न घाबरता ओरोपीच्या कृत्याचा जोराने विरोध दर्शवला होता, नंतर त्याच्या हाताचा चावा घेतला होता. यानंतर तरुणी घटनास्थळावरून पळून गेली आणि पीडितेनं आपला जीव देखील वाचवला.
हे ही वाचा : जालना : 'गाडीत बसून सोबत चल', तरुणीने दिलेला नकार जिव्हारी लागला, आरोपीने काय केलं?
आरोपींना अटकेत
या घटनेची माहिती मिळताच, बेगमपुरा पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला. पोलिसांनी आरोपी विशाल चवारियाला जुबली पार्क येथून अटक केली. तसेच मुख्य आरोपी रोहन रिडलॉन हा मुंबईकडे पळून जाण्याच्या मार्गावरच होता, इतक्यात पोलिसांनी त्याला जालन्यातून अटक केली आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहे.
