कार धुण्यावरुन वाद, दोन्ही गट इरेला पेटले; हाणामारीत एकाचा मृत्यू

मुंबई तक

Crime News : पटणा सिटीमध्ये कार धुण्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीचा धारदार वस्तूंनी हल्ला करण्यात आला. उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेहासह आंदोलन करत आरोपींच्या अटकेची मागणी केली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

कार धुण्यावरुन वाद, दोन्ही गट इरेला पेटले

point

हाणामारीत एकाचा मृत्यू

Crime News : कार धुण्यावरून झालेल्या वादातून झालेल्या हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दोन गटांमध्ये कार धुण्याच्या कारणावरून वाद सुरू झाला. त्यानंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी धारदार शस्त्रांचा वापर करून संबंधित व्यक्तीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शनिवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत मृत व्यक्तीचा मुलगाही जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर मृताच्या कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बिहारच्या पटणाध्ये ही घटना घडली. 

सुरुवातीला झालेला वाद वाढत गेला आणि त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन धुण्याच्या वेळी दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. सुरुवातीला झालेला वाद वाढत गेला आणि त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाली. या दरम्यान हल्लेखोरांनी धारदार वस्तूंनी संबंधित व्यक्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीच्या मुलाने सांगितले की, त्याच्या भावाने येऊन वडिलांना काही लोकांनी त्याला मारहाण केल्याचे सांगितले होते. त्यानंतर वडील आणि मुलगा काय झाले हे पाहण्यासाठी गेले असता त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. हल्ल्यात कात्री आणि चाकूचा वापर करण्यात आल्याचे त्याने सांगितले.

हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न

मृत व्यक्तीच्या मुलाने या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून दीपक कुमार, चंदन कुमार आणि रंजन कुमार यांची नावे सांगितली आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यात त्याच्या वडिलांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पटणा सिटीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी राज किशोर सिंह यांनी या घटनेबाबत माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, वाद झाल्यानंतर काही लोकांनी धारदार वस्तूने संबंधित व्यक्तींवर हल्ला केला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस तपास करत आहेत. हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी मृतदेहासह आंदोलन केले. कुटुंबीयांनी रस्त्याचा एक भाग रोखून धरला आणि आरोपींना अटक करून न्याय मिळावा, अशी मागणी केली. या घटनेनंतर परिसरात कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. स्थानिक पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कुटुंबीयांशी चर्चा केली. या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींविरोधात ठोस कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी कुटुंबीयांना दिले. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणातील परिस्थितीचा तपास केला जात असून हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचे आणि त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.