मुंबईची खबर : लोकलच्या पाससाठी UPI वापरताय? आता मोजावे लागणार अतिरिक्त शुल्क

मुंबई तक

लोकलने प्रवास करणाऱ्या आणि युपीआयचा वापर करुन पास काढणाऱ्या मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. MDR चार्जेस लागू झाल्यानंतर पास काढण्यासाठी प्रवाशांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

लोकलच्या पाससाठी UPI वापरताय?

point

आता मोजावे लागणार अतिरिक्त शुल्क

Mumbai News : लोकलने प्रवास करणाऱ्या आणि युपीआयचा वापर करुन पास काढणाऱ्या मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून दोन हजार रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचा सीझन पास युपीआयच्या माध्यमातून खरेदी केल्यास प्रवाशांना 5.90 रुपये अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागणार आहे. या नवीन आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये 5 रुपये मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) आणि 90 पैसे वस्तू व सेवा कराचा (GST) समावेश आहे.

किती रुपये मोजावे लागणार?

हा नवीन नियम 15 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. हा नियम उपनगरीय तसेच लांब पल्ल्याच्या दोन्ही प्रकारच्या रेल्वे तिकिटांच्या खरेदीसाठी लागू असेल. जे प्रवासी दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचा साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक सीझन पास युपीआयद्वारे काढतील, त्यांना हे अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. तथापि, जे प्रवासी थेट रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर जाऊन नेहमीप्रमाणे तिकीट किंवा पास खरेदी करतील त्यांना हा अतिरिक्त कर लागू होणार नाही.

हे ही वाचा : शेजाऱ्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध, शेवटी नदीकाठी सडलेला मृतदेह सापडला

एसी लोकलने प्रवास करणाऱ्यांना फटका

या निर्णयाचा सर्वाधिक फटका लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या तसेच फर्स्ट क्लास आणि एसी (AC) लोकलने प्रवास करणाऱ्या पासधारकांना बसणार आहे. उदाहरणार्थ, सीएसएमटी (CSMT) ते कल्याण दरम्यानच्या एका महिन्याच्या एसी पासची किंमत सध्या 2,340 रुपये आहे, परंतु युपीआयद्वारे पेमेंट केल्यास प्रवाशांना त्यासाठी 2345.90 रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे, याच मार्गावरील तीन महिन्यांच्या प्रथम श्रेणीच्या (फर्स्ट क्लास) पाससाठी, ज्याची किंमत सध्या 3,295 रुपये आहे, युपीआयद्वारे पेमेंट केल्यास 3,300.90 रुपये खर्च करावे लागतील.

हे ही वाचा : सतीश सालीयान मातोश्रीच्या बाहेर, ठाकरेंना नोटीस देत काय बोलून गेले?

अतिरिक्त खर्च रेल्वेने उचलावा

युपीआयच्या वापरावर लावण्यात आलेल्या चार्जेसवरुन सर्वत्र वाद रंगलेला पहायला मिळत आहे. अशातच रेल्वेने हा खर्च प्रवाशांवर न टाकता स्वतः उचलावा अशी मागणी करण्यात येत आहे.