60 वर्षीय मित्राचे गावातील महिलेशी अनैतिक संबंध, झोपेत असतानाच घडलं भयानक

मुंबई तक

अनैतिक संबंधातून एका साठ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. जवळच्या मित्रानेच ही हत्या केली. एका श्वानाच्या मदतीने उलगडलेली उत्तर प्रदेशमधील ही घटना नेमकी काय आहे, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

60 वर्षीय मित्राचे गावातील महिलेशी अनैतिक संबंध

point

झोपेत असतानाच घडलं भयानक

Crime News : एक 60 वर्षीय वृद्ध प्रवेश दुबे यांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. 18 सप्टेंबरच्या रात्री प्रवेश दुबे हे आपल्या घराबाहेर जनावरांजवळ टीन शेडखाली झोपले असताना, गावातच राहणाऱ्या ब्रजमोहन सिंह याने दारूच्या नशेत त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात प्रवेश दुबे यांचा जागीच मृत्यू झाला असून, सकाळी या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात खळबळ उडाली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील ही घटना आहे.

महिलेशी अनैतिक संबंध

फक्त संशयामुळे ही हच्या झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ब्रजमोहनच्या पत्नीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले होते आणि त्याचे एका महिलेसोबत संबंध असल्याची गावात चर्चा होती. घटनेच्या दोन दिवस आधी ब्रजमोहनने प्रवेश दुबे यांना त्याच महिलेशी बोलताना पाहिले होते. यातूनच त्यांच्यात काही संबंध असल्याचा संशय ब्रजमोहनच्या मनात निर्माण झाला. याच संशयाचे रूपांतर रागात झाले आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

हे ही वाचा : सतीश सालीयान मातोश्रीच्या बाहेर, ठाकरेंना नोटीस देत काय बोलून गेले?

'जॅकी'ची महत्त्वाची भूमिका

मृताचा मुलगा प्रशांत दुबे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरुवातीला तीन ओळखीच्या आणि चार अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासासाठी फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. या तपासात 'जॅकी' नावाच्या कुत्र्याने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. जॅकी घटनास्थळावरून थेट आरोपी ब्रजमोहनच्या घरापर्यंत पोहोचला. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी घटनेच्या वेळी एकटाच ये-जा करताना दिसला. 

हे ही वाचा : शेतातून दीड वर्षीय चिमुकलीच्या रडण्याचा आवाज आला अन् सगळेच हादरले, प्रेमसंबंधातून काय घडलं?

मक्याच्या शेतात लपवले पुरावे

सीसीटीव्ही फुटेज आणि इतर सबळ पुराव्यांच्या आधारे ब्रजमोहनची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. हत्या केल्यानंतर आरोपीने रक्तात माखलेली कुऱ्हाड आणि अंगावरील कपडे काढून मक्याच्या शेतात लपवून ठेवले होते. पोलिसांच्या दाव्यानुसार, आरोपीने दिलेल्या माहितीवरून हे दोन्ही महत्त्वपूर्ण पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या पुराव्यांमुळे आता या प्रकरणाच्या तपासाला अधिक बळ मिळाले असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.