जालना : 'गाडीत बसून सोबत चल', तरुणीने दिलेला नकार जिव्हारी लागला, आरोपीने काय केलं?

मुंबई तक

Jalna Crime News : जालन्यात प्रेमसंबंध न ठेवल्यास अॅसिड हल्ला करून जीवे मारेन, अशी एका तरुणीला धमकी दिली होती. संबंधित तरुणीचा आयफोन मोबाइल जबरदस्ती हिसकावून नेला आणि तिची बुलेट परत न दिली नाही. या प्रकरणी तिघांविरुद्ध तक्रार दाखल.

ADVERTISEMENT

Jalna crime news
Jalna crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

जर प्रेमसंबंध ठेवले नाहीस तर जीवे मारेन

point

अॅसिड फेकण्याची देखील दिली होती धमकी

Jalna Crime News : गौरव साळी - जालन्यात प्रेमसंबंध न ठेवल्यास अॅसिड हल्ला करून जीवे मारेन, अशी एका तरुणीला धमकी दिली होती. संबंधित तरुणीचा आयफोन मोबाइल जबरदस्ती हिसकावून नेला आणि तिची बुलेट परत न दिली नाही. यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणात तक्रारीनुसार, एका तरुणीची एका व्यक्तीसोबत वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रुपांतर झाले होते. 

हे ही वाचा : तरुणाचा मेहुणीवर जीव, प्रेयसीला संपवलं अन् 10 किमी अंतरावर फेकला मृतदेह

गाडीत बसण्यास तरुणीने नकार दिल्याने बेदम मारहाण

दोन महिन्यांपूर्वी संबंधित व्यक्ती तरुणीच्या घरी आला होता. तेव्हा त्याने तरुणीची संमती नसताना तिची बुलेट गाडी घेऊन गेल्याचा आरोप केला होता. बुलेट परत न दिल्याची पीडितेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, 10 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास तरुणी घरी जाताना संबंधित व्यक्तीने तिला अडवले होते. सोबत गाडीत बसून चल असे सांगितले, तेव्हा तरुणीने नकार दिला होता. यानंतर आरोपींनी पीडितेला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. 

हे ही वाचा : Astrology : बुध आणि शुक्र ग्रहाचा संयोग, 'या' राशींसाठी चांगले दिवस येणार

दोघांनीही शिवीगाळ केल्याचा आरोप 

जर प्रेमसंबंध ठेवले नाहीस तर जीवे मारेन, अशी धमकी देण्यात आली होती. यावेळी आणखी दोघांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच पीडितेचा आयफोन पळून नेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. एवढंच नसून अंगावर अॅसिड हल्ला देखील केल्याची माहिती आहे. या प्रकरणी तरुणाने आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं जालना पुन्हा एकदा हादरून गेले आहे.