मालकाने मुलीसोबत नोकराला खोलीत पाहिलं अन्.. भयंकर घडलं

crime news : खोली मालकाच्या मुलीसोबत नोकर बंद खोलीत आढळला होता. त्यानंतर तरुणीच्या वडिलांनी मुलाला बेदम मारहाण केली की ज्यात त्या नोकराचा दुर्दैवी मृत्यू झाला. नोकर म्हणून काम करणाऱ्या तरुणाची किरण अशी ओळख समोर आली.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मुलीचे आणि किरणचे प्रेमसंबंध

point

किरणसोबत मुलगी खोलीत आढळली 

Crime news : खोली मालकाच्या मुलीसोबत नोकर बंद खोलीत आढळला होता. त्यानंतर तरुणीच्या वडिलांनी मुलाला बेदम मारहाण केली की ज्यात त्या नोकराचा दुर्दैवी मृत्यू झाला. नोकर म्हणून काम करणाऱ्या तरुणाची किरण अशी ओळख समोर आली, तर मालकाची ओळख आनंदराज (वय 45) अशी आहे. आनंदराजची 19 वर्षीय तरुण मुलगी ही किरणसोबतच एका खोलीत होती, यातून किरणला बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली. या प्रकरणात आनंदराजला पोलिसांनी अटक केली. ही घटना  बंगळुरूच्या येलहंका परिसरात घडली होती. 

हे ही वाचा : TCS प्रकरणातील निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप, इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुलीचे आणि किरणचे प्रेमसंबंध

मृत किरण हा केरळच्या पालक्काड जिल्ह्याचा रहिवासी होता. तो बंगळुरूतील आनंदराज यांच्या कारखान्यात काम करत होता, जिथे स्वीट कॉर्न बनवण्याची यंत्रे आणि गाड्या बनवल्या जातात. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले की, आनंदराज यांना अलीकडेच त्यांच्या मुलीचे आणि किरणचे प्रेमसंबंध असल्याचे समजले होते. दुसऱ्या शहरात शिकणारी त्यांच्या मुलगी सुट्ट्यांसाठी घरी आली होती. मंगळवारी, याच मुद्द्यावरून घरात वाद झाला, ज्यातून किरणचा मृत्यू झाला. 

किरणसोबत मुलगी खोलीत आढळली 

पोलिसांच्या माहितीनुसार, आनंदराज आणि त्यांची पत्नी मंगळवारी सकाळी दिवसभर बाहेर असल्याचे सांगून घरातून निघाले. काही तासांनंतर परतले तेव्हा त्यांना किरण त्यांच्या मुलीसोबत खोलीत आढळली. यानंतर काय घडले याचा पोलीस तपास करत आहेत. 

आनंदराजच्या बेदम मारहाणीत किरणचा मृत्यू 

प्राथमिक तपासानुसार, आनंदराजने मुलीला चिक्कबळ्ळापूर येथील एका नातेवाईकांच्या घरी पाठवले आणि त्यानंतर किरणवर हल्ला केला. किरणला अनेक जखमा झाल्या आणि तो बेशुद्ध पडला होता. त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आले. रुग्णालयाने पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. 

हे ही वाचा : Astrology : दिवाळीत त्रिग्रही योग तयार होईल, 'या' राशींचे चमकेल भाग्य

दरम्यान, बंगळूरुच्या ईशान्य भागात डीसीपी जी. के. मिथुन कुमार यांच्या माहितीनुसार, आरोपी आनंदराज व्यावसायिकाला अटक केली. त्यांनी पुढे माहिती दिली की, प्राथमिक तपासातून आनंदराजने जाणीवपूर्वक किरणची हत्या करण्यात आली.