कंडका पाडणे म्हणजे नक्की काय? सतेज पाटलांनी सांगितला अर्थ

सध्या गोकुळमुळे सतेज पाटील चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांच्यासोबतच 'कंडका पाडणे' हा वाक्प्रचारदेखील चर्चेत आला आहे. त्याचा नेमका अर्थ काय? सतेज पाटील त्याविषयी नक्की म्हणाले?

ADVERTISEMENT

Satej Patil News
Satej Patil News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कंडका पाडणे म्हणजे काय?

point

सतेज पाटील काय म्हणाले?

Satej Patil News : सध्या गोकुळमुळे कोल्हापूरच्या राजकारणाची राज्यात आणि देशभरात चर्चा सुरु आहे. या सगळ्यात एक वाक्प्रचार चांगलाच गाजला तो म्हणजे कंडका पाडणे. या शब्दाचा अर्थ एखाद्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावणे, शेवट करणे असा होतो. मात्र मुंबई तकच्या चावडीत बंटी पाटलांनी हा शब्द निवडणुकीत कसा आला? त्याचा नेमका अर्थ काय?  याविषयी माहिती दिली.

कंडका पाडणे म्हणजे काय?

सतेज पाटील म्हणाले की, ' एखादी गोष्ट व्यवस्थित बाजूला करणे म्हणजे कंडका. ऊसाचा मूळापासून कंडका पाडावा लागतो, कारण साखर असते ती शेवटच्या बेण्यापर्यंत असते. त्यामुळे कंडका व्यवस्थित पडला पाहिजे.' कंडका पाडणे यासोबतच 'आमचं ठरलंय' ही टॅगलाईनदेखील कोल्हापुरातील राजकारणात चांगलीच गाजली होती. याविषयी बोलताना ते म्हणाले की, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं हे आमच्या टीममधून आलं होतं.'

हे ही वाचा : गोकुळमध्ये 5 शासन नियुक्त संचालक, आता बंटी पाटलांसाठी राज ठाकरेंची पोस्ट

आदित्या ठाकरेंनी मागितली टॅगलाईन

खास कोल्हापुरातील टॅगलाईन्सबाबत बोलताना ते म्हणाले की, 'आम्ही बसलो होतो एकत्रितपणे आणि त्यातून चार-पाच टॅगलाईन करत-करत त्यावर एकत्रित आलो. त्यावेळी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक चालू होती. मला आदित्य (ठाकरे) म्हटले आम्हाला पण टॅगलाईन तूच करुन दे. मी म्हटलो फीस लागेल. विनोदाचा भाग सोडला तर मातीशी निगडीत टॅगलाईन त्याठिकाणी होतात.'

हे ही वाचा : सतेज पाटील महायुतीला कसे पुरून उरले? बंटी पाटलांनी 'मुंबई Tak चावडी'वर सांगून टाकलं सीक्रेट!

गोकुळमध्ये विजय कसा मिळवला?

यावेळी मुंबई तक चावडीमध्ये बोलताना त्यांनी गोकुळमधील राजकारण, गोकुळमध्ये विजय कसा मिळवला अशा विविध प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. महायुती सरकारने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 कलम 73 अअअ (2) मध्ये सुधारणा करण्यास व त्याबाबत अध्यादेश काढण्यास मान्यता दिल्यामुळे राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे.