उल्हासनगर - 3 मध्ये विजेच्या धक्क्याने 26 वर्षीय तरुणीचा मृत्यू
Ulhasnagar News : उल्हासनगर - 3 येथून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ओटि परिसरात विजेचा धक्का लागून एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
उल्हासनगर - 3 येथून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक
26 वर्षीय तरुणीला विजेचा धक्का लागून मृत्यू
Ulhasnagar News : उल्हासनगर - 3 येथून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ओटि परिसरात विजेचा धक्का लागून एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे. मृत तरुणीची करिश्मा मडवानी (वय 26) अशी ओळख समोर आली आहे. करिश्मा ही गणेश अपार्टमेंट येथील रहिवासी आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगर: 20 वर्षीय तरुणीला जॉर्जर इमारतीच्या छतावर नेत केली जबरदस्ती
विजेच्या झटक्याने करिश्माचा मृत्यू
घडलेल्या घटनेनुसार, जिथे हा प्रकार घडला त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. याच सीसीटीव्हीत पोलिसांच्या संपर्कात करिश्मा आल्याने तिला अचानकपणे विजेचा झटका लागला होता. या दुर्घटनेता तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. अशातच मृत करिश्माच्या भावाच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात प्रकरण नोंदवण्यात आले होते.
दुर्घटनेसाठी कोणती बाब कारणीभूत?
दरम्यान, सीसीटीव्हीच्या पोलमध्ये नेमका करंट येण्यामागचे कारण काय? पोलमध्ये विद्युत प्रवाह जाण्याचे कारण काय होते? या दुर्घटनेसाठी नेमकी कोणती बाब कारणीभूत ठरली, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
हे ही वाचा : तरुणाचा मेहुणीवर जीव, प्रेयसीला संपवलं अन् 10 किमी अंतरावर फेकला मृतदेह
पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून तांत्रिक तपासणीनंतरच या दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सीसीटीव्ही पोलची विद्युत सुरक्षा, वायरिंग आणि देखभाल व्यवस्था याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. केवळ उल्हासनगरच नाही,तर देशभरात अशा विजेच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे स्थानिक प्रशासनाच्या सुरक्षिततेबाबतच्या कामकाजावर प्रश्न निर्माण होत आहे.
