MPSC कडून तलाठी भरती जाहीर! 1539 पदांसाठी अर्ज सुरु
'गट-क' सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत 1539 तलाठी पदांसाठी अधिकृत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्ट 2026 पर्यंत असणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
MPSC कडून तलाठी भरती जाहीर!
1539 पदांसाठी होणार भरती
Talathi Bharti 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) 'गट-क' सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत 1539 तलाठी पदांसाठी अधिकृत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमुळे प्रशासनात सेवेची संधी शोधणाऱ्या राज्यातील लाखो तरुण-तरुणींना मोठा दिलासा मिळाला आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
या पदभरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु असून ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्ट 2026 पर्यंत असणार आहे. तसेच उमेदवारांना परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी 8 ऑगस्ट 2026 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्जदाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (Degree) असणे अनिवार्य आहे. उमेदवारांचे वयोमर्यादा 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असून, राखीव वर्गातील उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयोमर्यादेत सूट लागू असेल.
हे ही वाचा : विद्यार्थ्यांना मारहाणीचा आदेश कोणी दिला? राहुल गांधींच्या पत्रातून अमित शाहांना दोन तिखट सवाल
परीक्षा शुल्क
या भरतीसाठीचा अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारला जाणार आहे. अराखीव (खुल्या) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 394 रुपये परीक्षा शुल्क ठेवण्यात आले आहे, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग आणि अनाथ उमेदवारांसाठी 294 रुपये शुल्क आकारले जाईल. इच्छुक उमेदवारांना आयोगाच्या mpsc.gov.in किंवा mpsconline.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपले अर्ज निश्चित वेळेत सादर करता येतील.
हे ही वाचा : "खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री इथेनॉलवर..",उद्धव ठाकरेंचा नितीन गडकरींवर प्रहार
परीक्षा कधी?
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे. संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख 25 ऑक्टोबर 2026 निश्चित करण्यात आल्याने उमेदवारांना अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. मुदतीनंतर आलेले अर्ज किंवा अपूर्ण माहिती असलेले अर्ज फेटाळले जातील, त्यामुळे उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत आपले ऑनलाईन अर्ज पूर्ण करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
