मस्करीत चेहऱ्याला लावला केक, सपासप वार करत तरुणाला संपवलं

मुंबई तक

Crime News :​​​​​​​ वाढदिवस सुरू असताना मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. केक कापण्यावरून तरुणाची निर्घृणपणे धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता.

ADVERTISEMENT

Crime News (AI Photo)
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

केक कापण्यावरून तरुणाची निर्घृणपणे हत्या

point

मस्करीवरून वाद अंघाशी

Crime News : वाढदिवस सुरू असताना मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. केक कापण्यावरून तरुणाची निर्घृणपणे धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता. जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, नंतर पीडित व्यक्तीला मृत घोषित केले होते. पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांनी आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती. ही धक्कादायक घटना जम्मूतील आहे. 

हे ही वाचा : पत्नीचे दुसऱ्या पुरूषासोबत प्रेमसंबंधाचा संशय, नवऱ्याने सपासप वार करून संपवलं

केक कापण्यावरून तरुणाची निर्घृणपणे हत्या 

घडलेल्या घटनेनुसार, गुरूवारी रात्री उशिराने जम्मूमध्ये रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करण्यात आली होती. तिथेच चार मित्र वाढदिवस साजरा करताना एकाने तरुणाच्या चेहऱ्यावर केक फासटला होता. अशातच संतापलेल्या संबंधित तरुणावर चाकूने वार केले, नंतर त्याची हत्या केली. अशातच आरोपी इतर दोघांसोबत घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, मृत व्यक्तीची पवन कुमार उर्फ समीर (वय 36) अशी ओळख समोर आली.  

मस्करीवरून वाद अन् हत्या 

पोलिसांच्या माहितीनुसार, जम्मू येथील डोमाना, नारदनी येथील रहिवासी नीरज उर्फ अंशु याचा वाढदिवस होता. वाढदिवसाचा केक कापण्यासाठी पवन, नीरज आणि त्याचे इतर दोन मित्रांसह वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करून चौघांनी केक कापण्यास सुरूवात केली होती. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शने सांगितलं की, पार्टीदरम्यान नीरजच्या चेहऱ्यावर केक फासण्यावरून मस्करी सुरू झाली होती, या मस्करीवरून वाद झाला आणि नंतर वादाचे हत्येत रुपांतर झाले. 

हे ही वाचा : चॅटजीपीटी वापरताना सापडला, आयआयटीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; संतप्त विद्यार्थ्यांची प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने

नीरज आणि पवन यांमध्ये आधी वाद झाला, नंतर एकमेकांमध्ये धरपकड झाली होती. नंतर रागाच्याभरात नीरजने पवनकुमारवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या गंभीर जखमी झालेल्या पवनला एका शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले होते.