पत्नीचे दुसऱ्या पुरूषासोबत प्रेमसंबंधाचा संशय, नवऱ्याने सपासप वार करून संपवलं

मुंबई तक

Crime News : पत्नीचे दुसऱ्या पुरूषासोबत अनैतिक प्रेमसंबंधाचा संशय होता. यावरूनच पत्नीची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पत्नीचे दुसऱ्या पुरूषासोबत अनैतिक प्रेमसंबंधाचा संशय

point

पत्नीचे नवऱ्यासोबत सतत वाद

Crime News : उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात महिलेच्या हत्येनं परिसरात एकच खळबळ उडाली. इस्लामनगर टिलिया येथे बुधवारी पहाटे एका महिलेची धारदार शस्स्त्राने हत्या केली. मृत महिलेची नगमा अशी ओळख पटली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तिचा पती परवेझ हा हत्येतील आरोपी असल्याची माहिती समोर आली. प्राथमिक तपासातून असे उघडकीस आले की, पत्नीचे दुसऱ्या पुरूषासोबत अनैतिक प्रेमसंबंधाचा संशय होता. यावरूनच हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

हे ही वाचा : आसनगाव-कसारा रेल्वे मार्गावर अपघाताच्या दोन घटना, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

पत्नीचे इतर पुरूषांसोबत प्रेमसंबंधावरून वाद 

घडलेल्या घटनेनुसार, परवेझ आणि त्याची पत्नी नगमा ही इस्लामनगर टिलिया भागात एका भाड्याच्या घरात सुमारे दीड महिन्यांपासून राहत होते. असे म्हटले जाते की, पत्नीचे इतर पुरूषांसोबत प्रेमसंबंधावरून दोघांमध्ये पूर्वी वाद झाला. बुधवारी पहाटे त्या दोघांमध्ये वाद झाला होता. या प्रकरणात असा आरोप केला की, परवेझने नगमावर धारदार शस्त्राने हल्ला केला.  या हल्ल्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर आपल्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. 

घटनेनंतर परवेझ स्वत: शहर पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने पोलिसांना पत्नीच्या हत्येची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता, जवळच्या रहिवाशांकडून माहिती गोळा केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी करण्यात आली. 

हे ही वाचा : Astrology : आजचे काही राशींचे भविष्य घ्या जाणून

पुरूषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय

या घटनेदरम्यान खूनाची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी न्यायवैद्यक पछक बोलावण्यात आले होते. पथकाने घटनास्थळावरून आवश्यक ते पुरावे गोळा केले होते. पोलीस खूनाचे शस्त्र आणि इतर पुराव्यांची तपासणी करत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, प्राथमिक तपासातून पत्नीचे दुसऱ्याच पुरूषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय समोर आला होता. संबंधित प्रकरणातील नेमका वाद काय? याचा पोलीस कसून तपास करत आहेत.